जळगावात पेट्रोल-डिझेलच्या दरात ११ दिवसात तीन रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 09:11 PM2018-05-25T21:11:01+5:302018-05-25T21:11:01+5:30
गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून या ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. २५ मे रोजी पेट्रोल ८६.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.८१ रुपये अशा उच्चांकीवर पोहचले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२५ : गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून या ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. २५ मे रोजी पेट्रोल ८६.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.८१ रुपये अशा उच्चांकीवर पोहचले.
महागाईच्या या वाढत्या भडक्याने नागरिक त्रस्त झाले असून वाहने चालवावे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मूल्यवर्धीत कर (व्हॅट) व इंधनावरील अधिभार यामुळे इंधनाचे दर वाढण्यास अधिकच मदत होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल ८० डॉलर दर असले तरी भारतात कधी नव्हे एवढे दर इंधनाचे वाढले आहेत. यामुळे देशभरात रोष व्यक्त होत असला तरी त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसत आहे.