सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:03 PM2020-03-25T12:03:12+5:302020-03-25T12:03:21+5:30
दिवसभरात आता मिळणार केवळ सहा तासच इंधन : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
जळगाव : राज्यात संचारबंदी लागू असताना नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल-डिझेल खरेदीवर निर्बंध घालण्यात आले असून यामध्ये आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच इंधन मिळणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. इंधन पुरवठ्यात वेळ ठरवून दिल्याने दिवसभरातून केवळ सहा तासच इंधन मिळणार आहे.
त्यामध्ये जळगाव शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व शहरांच्या तीन किलो मीटर परिसरातील सर्व पेट्रोल, डिझेल पंप हे सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेले आहे़ केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाºयांसाठीच पेट्रोल-डिझेल उपलब्ध असणार आहे़ त्यामुळे या पेट्रोल पंपांना वेळेच्या मर्यादाही आखून देण्यात आल्या आहे़
त्यानुसार हे पेट्रोल पंप सकाळी ७ ते १० तसेच दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी काढले आहे़
अनावश्यकरित्या फिरणाºया वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई
कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अनावश्यकरित्या फिरणाºया चारचाकी व दुचाकी वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता रस्त्यांवरील वाहतूकही प्रशासनाने प्रतिबंधित केले असून या विषयी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत़
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू असली तरी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत आहे. यास आळा बसावा म्हणून त्यात चारचाकी व दुचाकी वाहनांनाही अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश निर्गमित करूनदेखील नागरिक रस्त्यावर ये-जा करीत आहेत़
नागरिकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे वारंवार सूचनही नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करत आहे़ वाहने ये-जा करीत आहेत़ याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या ३ किलो मीटर परिसरातील सर्व दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, हलके, मध्यम आणि जड वाहतूकीचे वाहने (आॅटो रिक्षा वगळून) व अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरणारी इतर वाहने यांना रस्त्यावर ये-जा करण्यास मनाई करण्यात येत आहे़ असे आदेशात नमूद करण्यात आले आहे़ हे आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.
कारवाई होणार
दुचाकी व चारचाकी वाहनांना रस्त्यावरून ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे़ मात्र, अनाश्यकरित्या वाहने रस्त्यांवर फिरताना आढळून आल्यास त्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले आहेत़ दरम्यान, गॅरेज चालकांना दुकाने बंद ठेवण्यात आदेश देण्यात आले होते़ मात्र, सेवा देणाºया व पुरविणाºया वाहनांच्या दुरस्तीसाठी गॅरेज चालकांनी तत्पर राहण्याचेही सूचना केल्या आहेत़
यांना मिळणार इंधन
सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कर्तव्यावर असलेली वाहने, अत्यावश्यक आणि जीवनाश्यक वस्तू व सेवा पुरविणारी वाहने, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी डॉक्टर आणि नर्सेस वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, प्रसार माध्यमांची वाहने व प्रतिनिधींची वाहने, वृत्तपत्र विक्रेते व वितरणाशी संबंधित यंत्रणा, गणवेशधारी पोलीस अधिकारी, कर्मचारी, घंटागाड्या, पाणी पुरवठा करणारी वाहने, एनजीओ, अन्न-भाजीपाला, फळे, दूध पुरवठा करणारी वाहने यांनाच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे़
ओळखपत्र जवळ ठेवण्याच्या सूचना
पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी जाणाºया सर्व घटकांनी त्यांचे ओळखपत्र जवळ बाळगण्याचे अनिवार्य असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत़ तसेच वाहनांना देण्यात आलेले पासेसची खात्री करावी व मुळ पास ही जमा करून घेण्यात याव्या, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत़
ग्रामीण भागातही वेळापत्रक
जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील पेट्रोल व डिझेल पंपांवर वेळेचे निर्बंध घालण्यात आलेले आहे़ मात्र, हे पंप सर्वांसाठी खूले ठेवण्यात आलेले आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकाला सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहनामध्ये पेट्रोल भरता येणार आहे़ दरम्यान, निर्धारित केलेल्या वेळेतच पेट्रोल व डिझेल विक्री करावी व इतर वेळेत विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे़