नृत्याविष्कारातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 06:42 PM2020-02-10T18:42:48+5:302020-02-10T18:42:57+5:30

जळगाव : इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूलध्ये मोठ्या जल्लोषात वार्षिक स्रेहसंमेलन पार पडले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतिचे दर्शन घडविणारे विविधांगी ...

 The philosophy of Indian culture created through ethnography | नृत्याविष्कारातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

नृत्याविष्कारातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

Next

जळगाव : इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूलध्ये मोठ्या जल्लोषात वार्षिक स्रेहसंमेलन पार पडले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतिचे दर्शन घडविणारे विविधांगी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. तर शाळेचे चेअरमन नरेश चौधरी, मुख्याध्यापक सीक़े़ राजू, विजय चौधरी, शाळेचे समन्वयक गजानन पाटील तसेच संध्या चौधरी आणि विद्या पाटील यांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर पालकमंत्री व धरणगाव पंचायत समिती सभापती मुकूंद नन्नवरे यांचा सत्कार करण्यात आला. तर समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा इम्पिरिअल नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले. यात जेष्ठी सिव्हील सर्जन डॉ़ ए़सी़पाटील यांना आरोग्य सेवा पुरस्कार, आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ़ धर्मेंद्र पाटील यांना सैनिक सेवा पुरस्कार तसेच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी यांना युवा नेतृत्व पुरस्कार, डॉ़ उषा शर्मा, राजेश यावलकर व मुकूंद गोसावी, अ‍ॅड़ प्रकाश पाटील, पी़डी़चौधरी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांची धूम
दरम्यान, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गाण्यांवर बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थितांकडून दाद मिळवून घेतली. तर खान्देशातील विविध कला संस्कृतीचेही दर्शन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणातून घडवून दिले. तर विद्यार्थ्यांचे कराटे प्रात्यक्षिक आणि विद्यार्थिनींचे सिल्क मल्लखांब प्रात्यक्षिकानेही उपस्थितांना थक्क करून ठेवले होते.

Web Title:  The philosophy of Indian culture created through ethnography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.