फोन पे कस्टमर केअरमधून बोलणार्याने लावला ३ लाख ७६ हजारांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:52+5:302021-03-27T04:15:52+5:30

जळगाव : फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून आर्मीतील शिपायाला ३ लाख ७६ हजार रुपयांचा ऑनलाईन चुना लावल्याची ...

Phone Pay from Customer Care Lavala 3 lakh 76 thousand | फोन पे कस्टमर केअरमधून बोलणार्याने लावला ३ लाख ७६ हजारांचा चुना

फोन पे कस्टमर केअरमधून बोलणार्याने लावला ३ लाख ७६ हजारांचा चुना

Next

जळगाव : फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून आर्मीतील शिपायाला ३ लाख ७६ हजार रुपयांचा ऑनलाईन चुना लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी जळगावातील सायबर पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्याविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

कार्तिक दिलीप पाटील हे दोन वर्षांपासून आर्मीत शिपाई या पदावर आहेत. ते सध्‍या भुसावळात वास्तव्यास आहे. मित्र गणेश पाटील याने त्यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. एक महिन्यापूर्वी त्याने उसनवारीचे दहा हजार रूपये कार्तिक यांना फोन पे द्वारे पाठविले. मात्र, पैसे खात्यात न आल्यामुळे कार्तिक यांनी फोन पे कस्टमर केअरला संपर्क साधला. काही न समझल्यामुळे त्यांनी केअरमधील वरिष्ठांचा मोबाईल क्रमांक मागितला. क्रमांक मिळताच त्यांनी त्यावर संपर्क केला. त्यावर फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून पैसे परत मिळविण्यासाठी एनीडेस्क ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितले. नंतर ॲपवरचे कोड सांगण्यास सांगितले. कोड सांगताच, कार्तिक यांना बँक खात्यातून ६० हजार काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर पुन्हा ३ लाख १६ हजार ९९४ रूपये बँकेतून काढल्याचा संदेश मिळाला. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे कळताच, त्यांनी जे ॲप डाउलोड केले होते. ते बंद केले. अखेर गुरूवारी त्यांनी जळगावातील सायबर पोलीस ठाण्‍यात धाव घेवून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

==============

पैसे परत पाठवित असल्याचे सांगून खात्यातून काढून घेतले ३५ हजार

फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून मुरलीधर रघुनाथ माळी (रा.व्यंकटेश नगर) यांच्या बँक खात्यातून ३४ हजार ४३६ रूपये काढून ऑनलाईन फसवणूक केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्‍यात गुन्हा नोंदविण्‍यात आला आहे.

मुरलीधर माळी यांनी मुलाला फी साठी पैसे पाठविले होते. मात्र, मुलाच्या खात्यावर पैसे न जमा झाल्यामुळे त्यांनी फोन पे कस्टमर केअरला संपर्क साधला. नंतर वरिष्ठांचा क्रमांक मिळविला. त्यावेळी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ओटीपी पीन जाणून घेतले. काही वेळातच माळी यांना त्यांच्या बँक खात्यातून २४ हजार ९८७, ९ हजार ९९९ व ४५० रूपये कपात झाल्याचे तीन संदेश प्राप्त झाले. आपली फसवणूक होत असल्याचे कळताच, त्यांनी गुरूवारी सायबर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Web Title: Phone Pay from Customer Care Lavala 3 lakh 76 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.