चित्र, वक्तृत्वातून अवयवदानाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:02 PM2020-02-03T22:02:55+5:302020-02-03T22:03:42+5:30
रोटरीतर्फे जनजागृती अभियान : कर्करोग, अवयवदान, रक्तदानावर स्पर्धा
जळगाव : रोटरी क्लब बॉम्बे नॉर्थ, रोटरी क्लब पाचोरा- भडगाव व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जळगावात कर्करोग, अवयदान, रक्तदान यावर जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले़ यात सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. व नव्या कल्पना व उत्कृष्ट चित्र साकारून तसेच वक्तृत्वाच्या माध्यमातून कर्करोगाची कारणे, अवयवदान व रक्तदान यांचे महत्त्व विषद करणारा संदेश दिला़ उत्कृष्ट चित्रांना पारितोषिके देण्यात आली.
शनिवारी पाचोरा येथे ही स्पर्धा झाल्यानंतर रविवारी जळगाव शहरातील गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली़ मुंबई येथील डॉ़ अंजली पाटील, डॉ़ गिरीश वालावरकर यांनी मार्गदर्शन केले़ रूक्साना खान यांनी स्वच्छतेचे आवाहन केले़
रोटरी क्लब बॉम्बे नॉर्थचे अध्यक्ष हेमेंद्र शहा व जळगावचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यात अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करणे व कर्करोगावर मार्गदर्शन हे या उपक्रमाच्या आयोजनामागचे उद्देश असल्याचे ते म्हणाले़ यावेळी सचिव शिरीष तारे, धरम पोपट, सचिव संदीप शर्मा, सहप्रांतपाल अनिल अग्रवाल, डॉ़ शशिकांत गाजरे, डॉ़ जयंत जहागीरदार, डॉ. मंगला जंगले, डॉ़ तुषार फिरके, राजीव आडवाणी, डॉ़ काजल फिरके, प्रा़ शुभदा कुलकर्णी, सी़ डी़ पाटील, प्रभाकर जंगले, योगेश गांधी, जितेंद्र ढाके, स्वाती ढाके आदींची उपस्थिती होती़ कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी परीक्षण केले.
चित्रकला स्पर्धेतील विजेते
अ गट : प्रथम- जय मनोज ठाकरे, द्वितीय- तनिष्का अनिल सुरवाडे, तृतीय - भरत संजय सोनार, उत्तेजनार्थ - खुशी पवनकुमार हरवानी.
ब गट : प्रथम -समय चौधरी, द्वितीय - तनुश्री प्रकाश भारूडे, तृतीय- चहक मोहन गेही, उत्तेजनार्थ रोशनी प्रभारक बोर्डे.
क गट : प्रथम- सेजल गोपाल वनरा, द्वितीय-कोमल दिलीप निकम, तृतीय-विद्या हेमराज सपकाळे़
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
अ गट : प्रथम- योगिता पाटील (५ वी, जिजामाता माध्यमिक विद्यालय), द्वितीय- आर्यन मोरे (७ वी, जिजामाता माध्यमिक विद्यालय), तृतीय -दिव्या गोसावी (६ वी, य़ दे़ पाटील माध्यमिक विद्यालय), उत्तेजनार्थ- यश खैरनार (७ वी, बालनिकेतन विद्यामंदिर), ब गट : प्रथम- धनश्री सन्नांसे (जिजामाता माध्यमिक विद्यालय), द्वितीय - अंकिता गोपाळ माळी, (जिजामाता माध्यमिक विद्यालय), तृतीय हर्षा मानिक दहिभाते (जयदुर्गा माध्यमिक विद्यालय) उत्तेजनार्थ- आदित्य रवींद्र माळी (नवीन माध्यमिक विद्यालय) क गट : प्रथम- अंजली अहिरे (एसएनडीटी महाविद्यालय), द्वितीय- शीतल बाविस्कर (एसएनडीटी महाविद्यालय), तृतीय -चेतना सोनगिरे (एसएनडीटी महाविद्यालय)