पिलखोडला एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 03:06 PM2019-06-24T15:06:11+5:302019-06-24T15:06:49+5:30
घबराट : रोकड घेऊन चोरटे पसार
पिलखोड, ता.चाळीसगाव : येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी,चोरी झाली. पंधरा ते वीस हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. चोरीच्या घटना २३ रोजी पहाटे घडली.
२३ जून रोजी पहाटे दोन वाजे नंतर आज्ञात ३/४ ते चोरट्यांनी सुयोग मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून ८ हजार रुपये ुलांबविले.
तेथून चोरट्यांनी ९०० ते ९५० फुटवर सुरेंद्र भानुदास कुलकर्णी यांच्या घराच्या दरवाजेचे कूलूप तोडून घरात े प्रवेश केला़ कपाटातील वस्तु व रोख रूपये लंपास करुन दुसरीकडे मोर्चा वळविला.
कुलकर्णी दांमत्य हे आपल्या मुलाकंडे पुणे येथे गेले होते़ त्याच संधीचा फायदा चोरट्यानी घेतला़ आणि हात साफ केला.
कुलकर्णी हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून नेमके काय चोरीला गेले हे मात्र समजू शकले नाही़ चोरट्यानी अशाच मोर्चा जलाराम टेड्रर्सच्या दुकानातील सेटरचे कुलूप तोडून कॉऊंटरमधून ७ हजार ५०० रू चोरी केली़ तेथून त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन कॅबीन मध्ये प्रवेश केला तेथे लॉकर फोडले पण त्यात १० डॉलर असल्याने तेथून ते पसार झाले़ एकाच गावात चार ठिकाणी चोरट्यांनी चोरीचे धाडस केल्याने गावात मोठी घबराट पसरली आहे़ भितीचे वातावरण पसरले आहे़ सजंय नीळकंठ वाघ यांनी फिर्याद दिली त्यानुसार हेडकॉन्स्टेबल शालीग्राम कुंभरे व कमरे यांनी त्या ठिकाणी जावून पचंनामा केला़ डीवायएसपींची भेट
चोरीच्या घटनेचे वृत्त समजताच चाळीसगांवचे डीवाएसपी उत्तम कडलग व मेहुणबारेचे एपीआय जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली व या अज्ञात चोरट्याची कसून तपास करू व आरोपींना जेरबंद करू असे हिरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़