पिंपळभैरव परिसरात वादळामुळे पडलेले पोल ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:54+5:302021-06-11T04:11:54+5:30

१७ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिपळभैरव शिवारातील गट नबर ९८ / २ या शेतात सिमेंट पोल पडला ...

In Pimpalbhairav area, the poles that fell due to the storm are 'as is' | पिंपळभैरव परिसरात वादळामुळे पडलेले पोल ‘जैसे थे’च

पिंपळभैरव परिसरात वादळामुळे पडलेले पोल ‘जैसे थे’च

Next

१७ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिपळभैरव शिवारातील गट नबर ९८ / २ या शेतात सिमेंट पोल पडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार केली. वादळामुळे पोल जमीनदोस्त झाला आहे. विद्युत तारा तुटून शेतात पडल्या आहेत. पेरणीचे दिवस असल्याने शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे या तारांमुळे खोळंबली आहेत. हे कोसळलेले पोल उभे करावेत व तारांची जोडणी करावी, यासाठी बहादरपूर येथील महावितरण कंपनीच्या अधिकारी व लाईनमनना माहिती तसेच निवेदन देण्यात आले. मात्र, महिना उलटत आला तरी महावितरण कंपनीचा एकही अधिकारी वा कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले नाहीत.

शेतकऱ्यांना पेरणी व लागवड करण्यास अडचणी येत असल्याने हे शेतकरी सामूहिक उपोषणाला बसणार आहेत. पेरणीसाठी उशीर झाला तर होणाऱ्या नुकसानीला महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असेही शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: In Pimpalbhairav area, the poles that fell due to the storm are 'as is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.