पिंपळगाव खुर्दला शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 03:11 PM2019-04-28T15:11:43+5:302019-04-28T15:12:23+5:30

कर्जबाजारी : पत्नीच्या सातबारावरही कर्ज

Pimpalegaon Khurda farmer suicides | पिंपळगाव खुर्दला शेतकऱ्याची आत्महत्या

पिंपळगाव खुर्दला शेतकऱ्याची आत्महत्या

Next

भुसावळ : तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे कर्जबाजारी पणाला कंटाळून ६० वर्षीय शेतकरी पुंडलिक पाटील यांनी आत्महत्या केली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, तलाठी अंजुषा जाधव यांनी पाटील यांच्या घरी जाऊन या घटनेची माहिती पुंडलिक पाटील यांच्या कुटुंबीयांकडून जाणून घेतली.
यानंतर या घटनेबाबतचा अहवाल तलाठी जाव यांनी तहसील कार्यालयाला सादर केला.
प्रशासनाकडून याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, पुंडलिक त्र्यंबक पाटील या शेतकºयाच्या नावावर शेती नाही, मात्र त्यांच्या पत्नीच्या नावावर पिंपळगाव खुर्द येथे गट नंबर ६६ क्षेत्रात २ हेक्टर ८६ आर. एवढी शेतजमीन आहे.
शिवाय विविध कार्यकारी सोसायटीचे पन्नास हजार रुपये, ८० हजार व दीड लाख रुपये असे त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सातबारा उताºयावर तीन ठिकाणी कर्ज असल्याची नोंद आहे.
दरम्यान , सुनील पंडित पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास संदीप बडगे करीत आहेत.
गावात हळहळ
कर्जबाजारी शेतकरी पुंडलिक पाटील यांच्या आत्महत्येमुळे पिंपळगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Pimpalegaon Khurda farmer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.