पिंपळगावी देशभक्तीचा गजर : देशाच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी उडाली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 09:19 PM2020-11-28T21:19:51+5:302020-11-28T21:20:44+5:30
ठिकठिकाणी लागले बॅनर
चाळीसगाव : शहिद यश देशमुख यांच्या बलिदानाने शोकमग्न असलेल्या पिंपळगावी शनिवारी गावक-यांनी आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जड अंतकरणाने बळ एकवटले. ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहणारे बॕनर लावण्यात आले होते. अवघा परिसर देशभक्तिच्या भावनेने भारावून गेला होता. प्रत्येकाचा मुखातून भारतमातेचा जयघोष निनादत होता.
शहीद यश देशमुखांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मेजर सचिन पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख रविंद्र पाटील, मेजर संदीप शिरुडकर, उल्हास पाटील, विजय पाटील, सौमित्र पाटील, विठ्ठल सावंत, दत्तात्रय पाटील, भूषण पाटील, प्रदीप तेली, योगेश पाटील, विनोद झोडगे, विजय वायकर, जयदीप पाटील, अभिमन्यू जाधव, प्रशांत पाटील, कमलेश पाटील आदी सहभागी झाले होते.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.चे गटनेते शशिकांत साळुंखे, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जि.प. सदस्य पोपट भोळे, अतुल देशमुख, पं.स.चे सभापती अजय पाटील, नगरसेववक रामचंद्र जाधव, श्याम देशमुख, भगवान पाटील यांच्यासह देशमुख परिवारातील सदस्य, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक आदि उपस्थित होते.
प्रतिभा चव्हाणांनी केली सजावट
शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत शहिद यश देशमुख यांच्या अत्यंविधीसाठी प्रशासनाने चबुतरा तयार केला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी महिलांसोबत रांगोळी रेखाटून फुलांची सजावटही केली.