पिंप्राळ्यातील एका बिल्डरसह चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 10:43 AM2017-06-16T10:43:32+5:302017-06-16T10:43:32+5:30

शासनाची फसवणूक : आरोपींमध्ये पाचोरा पीपल्स बँक व्यवस्थापकाचाही समावेश

Pimpalwala builder, crime against four | पिंप्राळ्यातील एका बिल्डरसह चौघांविरुद्ध गुन्हा

पिंप्राळ्यातील एका बिल्डरसह चौघांविरुद्ध गुन्हा

Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.16 : पिंप्राळा येथे मिळकतीच्या जमिनीचे बेकायदेशीररित्या हस्तांतरण करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील चौघांविरुद्ध गुरूवारी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े संशयितांमध्ये गुरूकृपा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सच्या मालकासह पाचोरा पीपल्स को-ऑप बँकेच्या जळगाव शाखेच्या व्यवस्थापकाचा समावेश आह़े
पिंप्राळा येथे एन. रामाराव मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था आह़े विजय गो¨वंदा कोचूरे यांना या संस्थेतील गट नं 16 व 17 चे प्लॉट नं 1 अ मधील मिळकत मिळालेली आह़े मिळकत ही गहाण ठेवणे, हस्तांतरण, वापरात बदल करणे या अर्टी शर्ती संदर्भात जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असताना कोचूरे यांनी मिळकत ही गुरूकृपा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे साहेबराव ओंकार साळुंखे यांना हस्तांतरण करून न देता जनरल मुखत्यार पत्र तयार करून देवून बेकायदेशीररित्या हस्तांतरण करून अर्टी शर्तीचा भंग केला़
गुरूकृपा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे प्रो.प्रा.नामदेव पौलाद पाटील यांनी बेकादेशीररित्या हस्तांतरण झालेल्या मिळकतीवर जळगाव शहरातील पाचोरा को ऑप बँकेचे व्यवस्थापक लालचंद आर. गौड यांच्या मदतीने मिळकतीवर बेकायदेशीररित्या 55 लाख रूपये कर्ज काढल़े एवढेच नाहीतर चौघांनी  संगनमताने दूध डेअरी टाकून मिळकतीवर बोजा चढविला़
गुरूवारी पिंप्राळा भागाचे मंडळधिकारी रवींद्र नामदेव उगले यांच्या फिर्यादीवरून मिळकतधारक विजय गोविंदा कोचुरे, गुरुकृपा बिल्डर्स व डेव्हलपर्सचे प्रतिनिधी साहेबराव ओंकार साळुंखे, नामदेव पाटील व लालचंद गौड या चौघांविरुद्ध भादवी कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Web Title: Pimpalwala builder, crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.