ग्रामस्वच्छता अभियानात पिंगळवाडे प्रथम
By admin | Published: April 18, 2017 11:10 AM2017-04-18T11:10:04+5:302017-04-18T11:10:47+5:30
संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पिंगळवाडे ता.अमळनेर प्रथम, घुमावल बुद्रूक ता.चोपडा व फुलगाव ता.भुसावळ तृतीय आले.
Next
जळगाव,दि.18- स्वच्छता, एकता, सांडपाणी व्यवस्थापन आदींसाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पुरस्कार पाहणी कार्यक्रमानंतर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्यात संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पिंगळवाडे ता.अमळनेर प्रथम, घुमावल बुद्रूक ता.चोपडा व फुलगाव ता.भुसावळ तृतीय आले.
तर विशेष पुरस्कारांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व वसंतराव नाईक पुरस्कारासाठी टोळी ता.एरंडोल, कुटुंब कल्याणसंबंधी आबासाहेब खेडकर पुरस्कारासाठी सुलवाडी ता.रावेर आणि सामाजिक एकता बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी टहाकळी ता.भुसावळ या गावांची निवड झाली आहे. ही गावे या पुरस्कारांच्या स्पर्धेसाठी विभागीय स्तरावरही पात्र ठरली असून, त्याची माहिती विभागीय आयुक्त, नाशिक कार्यालयास दिली आहे, असे जि.प.तर्फे सांगण्यात आले. या गावांची पाहणी जिल्हास्तरीय समितीने केली होती. आता विभागीय स्तराच्या पाहणीसाठी इतर ठिकाणाहून पथक येईल.