पिंक रिक्षाच्या आधाराने मिळणार महिलांच्या पंखांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:07+5:302021-09-27T04:17:07+5:30

डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी व खुशाल ऑटोमोबाइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तरुणी ...

Pink rickshaws will give strength to women's wings | पिंक रिक्षाच्या आधाराने मिळणार महिलांच्या पंखांना बळ

पिंक रिक्षाच्या आधाराने मिळणार महिलांच्या पंखांना बळ

Next

डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी व खुशाल ऑटोमोबाइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तरुणी व महिलांना स्वबळावर समाजात आपले स्थान निर्माण करता येणार आहे. त्यासाठी इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी व ऑटोमोबाइल यांनी दिनांक ११ नोव्हेंबरपर्यंत १०० पिंक रिक्षा वितरित करण्याचा संकल्प केला आहे. शहरासह जिल्ह्यातील ज्या तरुणी व महिला रिक्षा व्यवसायात येण्यास इच्छुक आहेत, त्यांना रिक्षा चालवण्याचे ट्रेनिंग देणे, परवाना काढण्यास मदत करणे, जिल्हा परमिट व नवीन रिक्षा घेऊन देण्याकरिता आर्थिक सहकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात समन्वय करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.

पिंक रिक्षा महिलांकरिता उत्पन्नाचे चांगले साधन होऊ शकते. रिक्षा या मुलांना व महिला प्रवाशांना ने-आण करण्याकरिता सुरक्षित असणार आहेत. इतर शहरांमध्ये पिंक रिक्षा या मोठ्या प्रमाणात असून, जळगाव शहरातील तरुणी व महिलांनी या व्यवसायात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

260921\img-20210925-wa0046.jpg~260921\1324-img-20210925-wa0045.jpg~260921\26jal_1_26092021_12.jpg

पिंक रिक्षा~पिंक रिक्षा फोटो~पिंक रिक्षाच्या आधाराने मिळणार महिलांच्या पंखांना बळ

Web Title: Pink rickshaws will give strength to women's wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.