6 हजार हेक्टरला पाईपलाईनने पाणी
By admin | Published: January 8, 2017 12:58 AM2017-01-08T00:58:55+5:302017-01-08T00:58:55+5:30
जळगाव : वाघूर धरण क्षेत्रात सहा हजार हेक्टर क्षेत्राला पाईप लाईनने पाणी देण्याचे नियोजन असून 145 कोटींच्या या कामांची निविदा प्रक्रिया वाघूर प्रकल्प विभागाने सुरूवात केली आहे.
जळगाव : वाघूर धरण क्षेत्रात सहा हजार हेक्टर क्षेत्राला पाईप लाईनने पाणी देण्याचे नियोजन असून 145 कोटींच्या या कामांची निविदा प्रक्रिया वाघूर प्रकल्प विभागाने सुरूवात केली आहे.
गेल्या काही वर्षात वाघूर धरणात मुबलक पाणी पुरवठा होत आहे. मात्र लाभक्षेत्रातील गावांसाठीच्या कालव्यांची कामे गेल्या काही वर्षापासून रखडल्याने पाणी असताना त्याचा वापर होऊ शकलेला नाही.
सिंचन क्षेत्रातील जळगाव तालुक्यातील जवळपास 16 गावांनी कालव्यांच्या कामांना विरोध करून आम्हाला कालव्याने पाणी नको अशी भूमिका घेतली होती. त्यावर उपाय म्हणून तापी पाटबंधारे विभागाने बंदीस्त पाईप लाईनने सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार वाघूर क्षेत्रातील सहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी बंदीस्त पाईप लाईनने पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाघूर प्रकल्प विभागाने आराखडे तयार करून त्यास मंजूरी मिळविली आहे. निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. बंदीस्त पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा करण्याच्या या योजनेत जळगाव तालुक्यातील नशिराबादचा काही भाग, भादली, भोलाणे, सुजदे, कडगाव, जळगाव खुर्द, सुजदेनांद्रे, आवार, रिधुर या गावातील शेतांर्पयत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे