व्यापाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:51 AM2019-06-05T11:51:50+5:302019-06-05T11:52:05+5:30
जळगाव जिल्ह्यातील चहार्डी-वेले रस्त्यावरील थरार
चोपडा, जि. जळगाव : शेळ््या-मेंढ्यांचा व्यापार करणाºया व्यापाऱ्यांना चोपडा तालुक्यातील चहार्डी वेले रस्त्यावर साखर कारखान्याच्या गेटजवळ अज्ञात चार दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार ते पाच लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापारी आणि दरोडेखोर यांच्यात झटापटी झाल्याने व शेजारील शेतातील शेतकरी घटनास्थळी धाव घेऊन आल्याने व्यापाºयांच्या ताब्यातील रोकड सुरक्षित राहिली. मात्र दहा ते पंधरा हजार रुपये लुटून दरोडेखोर पसार झाले आहेत. ही घटना ५ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
दरोडेखोरांनी गेटजवळ रस्त्याच्या कडेला पडलेले मोठमोठे दगड धोंडे आडवे लावून व्यापाºयांचे वाहन अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या गेटच्या मागच्या बाजूला गावठी कट्टा फेकून दरोडेखोर पसार झाले आहेत. गावठी कट्टा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.
व्यापारी दिलीप काशीनाथ धनगर (रा. चहार्डी) आणि कलीम सलील खाटिक (रा. हातेड बु) हैदराबाद येथे शेळ्यामेंढ्या विकून परत चहार्डी येथे परत येत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कारखान्याच्या गेट शेजारी रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड पाटाच्या चारी शेजारी आडवे करून वाहन अडवले. चार दरोडेखोरांकडे गावठी पिस्तूल होता. त्याचा धाक व्यापाºयांना दाखवला आणि व्यापाºयांच्या ताब्यात असलेली अंदाजे चार ते पाच लाख रु लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र घटना स्थळापासून वेल्याकडे वाहन चालक संतोष जाधव याने काही अंतरापर्यंत पळत जाऊन शेतकरी विनोद पाटील आणि लीलाधर पाटील यांना सदर घटना सांगितली. शेतकरी व चालक परत घटना आल्याने व तोपर्यंत व्यापारी आणि दरोडेखोर यांच्यात झटापट सुरूच होती. त्यात दरोडेखोरांनी व्यापाºयांना व त्यांच्यासोबत असलेला छोटू बापू धनगर यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघेही व्यापाºयांना मुक्कामार लागला असून ते चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेचे वृत्त समजताच चोपडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, फौजदार यादव भदाने आणि पोलिस कुमकने धाव घेतली.
चोपडा साखर कारखान्याच्या गेटच्या मागच्या बाजूला फेकलेला गावठी कट्टा पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी वाहन चालक संतोष जाधव (२८, रा. अजनाड बंगला) ता. शिरपूर आणि छोटू बापू धनगर (रा. चहार्डी) यांची पोलिसांनी घटनास्थळी कसून चौकशी केली. दोघांकडील मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे करीत आहेत.