बोदवड तालुक्यातील जामठी येथील शासकीय व्यापारी संकुलनाची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:40 PM2018-12-08T15:40:13+5:302018-12-08T15:41:45+5:30

जामठी, ता. बोदवड , जि.जळगाव : येथे ग्रामपंचायतीने १९ वर्षांपूर्वी बांधलेल्या व्यापारसंकुलाची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीने त्याची डागडुजी करून ...

The pitiful state of the government business complex of Jamthi in Bodwad taluka | बोदवड तालुक्यातील जामठी येथील शासकीय व्यापारी संकुलनाची दयनीय अवस्था

बोदवड तालुक्यातील जामठी येथील शासकीय व्यापारी संकुलनाची दयनीय अवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायतीने १९ वर्षांपूर्वी केले होते बांधकामव्यापारसंकुलांचा आजच्या स्थितीत उपयोग होतोय गुरांचा चारा, लाकडे ठेवण्यासाठीग्रामपंचायत म्हणते, डागडुजी करून गरजू बेरोजगारांना देणार

जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : येथे ग्रामपंचायतीने १९ वर्षांपूर्वी बांधलेल्या व्यापारसंकुलाची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीने त्याची डागडुजी करून गरजू सुशिक्षित बेरोजगारांना द्यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
बोदवड तालुक्यातील जामठी येथील लोणवाडी रस्त्यांवरील शासनाच्यावतीने सन १९९९ साली लाखो रुपये खर्च करून येथे शासकीय व्यापारी संकुल बनविण्यात आले आहे. गावातील पाच सुशिक्षित बेरोजगारासाठी प्रत्येकी एक-एक गाळा व्यवसायाकरिता देण्यात आला आहे. मात्र या संकुलामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्यावतीने कुठलाही व्यवसाय सुरू करण्यात आलेला नाही. त्यांचा उपयोग सद्य:स्थितीत लाकडे, गुरांचा चारा भरून ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी या व्यापारी संकुलाच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करणे सुरू केले आहे. त्यामुळे हे व्यापारी संकुल व्यवसायासाठी आहे या गोडाऊनसाठी आहे का, असा संतप्त सवाल येथील सुशिक्षित बेरोजगार विचारत आहे.
ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीने हे व्यापारी गाळे दिले होते त्यातील एकानेही कुठलाही महसूल येथील ग्रामपंचायतीला भरणा केलेला नाही.
हे व्यापारी गाळे ग्रामपंचायत लवकरच ताब्यात घेणार आहे. त्यांची डागडुजी करून व नवीन शटर बसवून येथील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी वितरीत करू, असे येथील ग्रामसेवक गोविंद राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, येथे बांधण्यात आलेले शासकीय व्यापारी संकुलन हे चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याने याचा व्यवसायासाठी उपयोग होऊ शकत नाही, असे सध्या वापर करीत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: The pitiful state of the government business complex of Jamthi in Bodwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.