जळगावच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:05+5:302020-12-23T04:13:05+5:30

शिरसोलीनाका शहरातील अत्यंत वर्दळीचा हा भाग आहे. पाचोरा, चाळीसगाव व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येेने वाहनधारकांची ये-जा सुरू असते. इच्छादेवी ...

Pitting at the entrance of Jalgaon | जळगावच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे तोरण

जळगावच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे तोरण

Next

शिरसोलीनाका

शहरातील अत्यंत वर्दळीचा हा भाग आहे. पाचोरा, चाळीसगाव व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येेने वाहनधारकांची ये-जा सुरू असते. इच्छादेवी चौफुली ते गायत्रीनगर या दरम्यान मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. डी मार्टसमोर गटारीचा ढापा तुटल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षितजाळी न लावता मोठ-मोेठे दगड ठेवल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला खाद्यपदार्थांच्या हातगाड्या व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रिक्षा व इतर प्रवासी वाहने उभी राहत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे.

रेमंड चौक परिसर

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील रेमंड चौकापासूनच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. साइडपट्ट्याचींही दुरवस्था झाल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तसेच या महामार्गावर थेट अजिंठा चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांचे अतिक्रमण व मालवाहतूक वाहने उभी राहत असल्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

Web Title: Pitting at the entrance of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.