अवयवदानासाठी धोरण ठरविणार, मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला प्लॅन 

By विजय.सैतवाल | Published: April 7, 2023 06:30 PM2023-04-07T18:30:12+5:302023-04-07T18:31:20+5:30

जळगावात अवयवदान जनजागृती, उपचार अभियानास प्रारंभ 

Plan will be decided for organ donation, minister Gulabrao Patal said | अवयवदानासाठी धोरण ठरविणार, मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला प्लॅन 

अवयवदानासाठी धोरण ठरविणार, मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला प्लॅन 

googlenewsNext

जळगाव : अवयवदानामुळे कोणाला जीवदान मिळू शकत असले तरी त्या साठी नागरिक पुढे येत नाही. या विषयी जनजागृती वाढून त्यासाठी प्रोत्साहन मिळावे व अवयवदान वाढावे, यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल,  अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अवयवदान जनजागृती व उपचार अभियानास शुक्रवार, ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून प्रारंभ करण्यात आला.

पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जनजागृती अभियानाचे फलक हाती घेऊन मान्यवरांनी अभियानाला सुरुवात केली. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावस्कर, नोडल ऑफिसर डॉ. सुनयना कुमठेकर  उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतला सेल्फी

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभियानाविषयी माहिती दिली. यावेळी अवयवदान केलेल्या नातेवाईकांचा व जनजागृती करणारे डॉ. पल्लवी राणे, डॉ. रवींद्र पाटील, सीमा भगत, किशोर सूर्यवंशी यांचा पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.  अवयवदान जनजागृतीबाबत महाविद्यालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे उदघाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच रांगोळी, पोस्टर्सचे अवलोकन केले. याठिकाणी जनजागृतीपर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर त्यांनी सेल्फी घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री यांनी ट्रॉफी देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्या ग्रुपचादेखील सत्कार केला. यावेळी अवयवदान जनजागृतीची उपस्थितांना शपथ देण्यात आली.  

डीपीसीतून निधी
अवयवदान श्रेष्ठदान असून नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रचार व प्रसारासाठी पुढे आले पाहिजे. अवयवदान मोहिमेसाठी शासकीय पातळीवर विविध विकासात्मक निर्णय घेतले जातील. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) निधी उपलब्ध करून देत लोककलावंतांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती केली जाई‌ल, असेही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. 
सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले तर  डॉ. योगिता बावस्कर यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रुग्णांची चौकशी
कार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची  चौकशी केली. रुग्णालयातील सेवा-सुविधांविषयी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली.  

स्पर्धेतील विजेते
पोस्टर स्पर्धा - प्रथम : प्रतिज्ञा मोरे व कृष्णाई साळुंखे, द्वितीय : हनीफा मोमीन, तृतीय : प्रियंका शेळके. 
रांगोळी स्पर्धा - प्रथम : गीतांजली आवारे, समृद्धी कवडे, द्वितीय : निकिता बाऱ्हे, पूजा दैठणकर, तृतीय : अंशीका मौर्या, साक्षी मोहर.

Web Title: Plan will be decided for organ donation, minister Gulabrao Patal said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.