कोविशिल्डचेच दोन डोस होतील असे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:19 AM2021-01-16T04:19:45+5:302021-01-16T04:19:45+5:30
जळगाव : पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला कोविशिल्ड या लसीकरणाचे २४ हजार ३२० डोस प्राप्त झाले आहेत. मात्र, हे डोस सर्व ...
जळगाव : पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला कोविशिल्ड या लसीकरणाचे २४ हजार ३२० डोस प्राप्त झाले आहेत. मात्र, हे डोस सर्व कर्मचाऱ्यांना पुरेसे नाहीत. यात पूर्ण लसीकरण होईल इतक्याच कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिन ही लस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे एकत्रित दोन लसींचा गोंधळ टाळण्यासाठी आहे त्या डोसमध्ये पूर्ण लसीकरण संपविण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती आहे.
..अशी आहे जबाबदारी
नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्याकडे चोपड्यासह सर्व केंद्रांचे नियंत्रण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासह सर्व केंद्रांचे नियंत्रण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्याकडे भुसावळ, जामनेर, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्याकडे चाळीसगाव आणि पारोळा, महापालिका डी.बी. जैन. रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पाच प्रमुख अधिकारी डोस ने-आण करण्यासाठी एक परिचारिका आणि सहाय्यक असे नियोजन राहणार आहे.