उमविने सुट्ट्यांमध्ये बदल केल्याने प्राध्यापकांचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:27 PM2017-10-14T17:27:13+5:302017-10-14T17:29:30+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नव्याने सुट्टीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, आधी विद्यापीठाने १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जाहीर केलेली सुट्टी आता. १६ ते २५ आॅक्टोबर व ११ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ठरविण्यात आली आहे. मात्र यामुळे प्राध्यापकांकडून आखण्यात आलेले सुट्टीचे नियोजन कोलमडले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१४-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नव्याने सुट्टीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, आधी विद्यापीठाने १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जाहीर केलेली सुट्टी आता. १६ ते २५ आॅक्टोबर व ११ ते २६ नोव्हेंबर दरम्यान ठरविण्यात आली आहे. मात्र यामुळे प्राध्यापकांकडून आखण्यात आलेले सुट्टीचे नियोजन कोलमडले आहे.
विद्यापीठाकडून दरवर्षी हिवाळी सुट्ट्यांचे नियोजन केले जात असते. यावर्षी विद्यापपीठाने १ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. मात्र विद्यापीेठाने १४ आॅक्टोबर, शनिवारी तातडीने नव्याने परिपत्रक काढून हिवाळी सुट्ट्या या दोन टप्प्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
प्राध्यापकांची उडाली धांदल
विद्यापीठाने १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या जाहीर केल्याने, प्राध्यापकांकडून सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले होते. अनेकांनी सुट्ट्यांदरम्यान पर्यटन करण्याचे नियोजन आखले होते. तसेच अनेकांनी यासाठी रेल्वेचे आरक्षण देखील करून घेतले होते. मात्र विद्यापिठाने ऐनवेळी बदल केल्याने, रेल्वेचे आरक्षण रद्द करण्यासाठी प्राध्यापकांची धावपळ सुरु झाली आहे.सुट्ट्यांचे नियोजन बदलविण्याबाबत विद्यापीठाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
विद्यापीठ कर्मचाºयांचा १६ सप्टेंबरची पर्यायी सुट्टी जाहीर
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी तिसºया शनिवारी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी कार्यरत होते. त्यामुळे १६ सप्टेंबरची पर्यायी सुटी १७ आॅक्टोबर रोजी जाहिर करण्यात आली आहे. तसेच १८ आॅक्टोबर रोजी दिवाळी असल्यामुळे कुलगुरुंच्या अधिकारातील ही सुटी जाहीर करण्यात आली आहे. १७ व १८ आॅक्टोबर, रोजी दिवाळीनिमित्त विद्यापीठाचे प्रशासकीय विभाग,शैक्षणिक प्रशाळा बंद राहणार असल्याची माहिती कुलसचिव बी.बी.पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.