थकबाकीदारांच्या नावाचे लावले जाहीर फलक
By Admin | Published: March 20, 2017 12:32 AM2017-03-20T00:32:53+5:302017-03-20T00:32:53+5:30
जामनेर पालिकेची आक्रमक भूमिका : नळ कनेक्शन तोडले, जप्तीची कारवाईदेखील करणार
जामनेर : नगरपालिकेचे विविध कर थकविणा:यांविरोधात पालिका प्रशासनातर्फे कारवाईची आक्रमक भूमिका घेण्यात आली असून थकबाकीदारांची नावे मोठय़ा फलकावर लिहून विविध चौकात हे फलक लावण्यात आले आहेत, त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून दि. 19 मार्च रोजी रविवार असूनही सुमारे चार लाखांची वसुली झाली आहे.
शहरात घरपट्टी, नळपट्टी, व व्यापारी संकुल, तसेच एमआयडीसीतील प्लॉटधारकांकडे विविध प्रकारच्या करांची बाकी असून वसुलीसाठी न.पा.तर्फे वारंवार तगादा लावूनही थकबाकीदार दादच देत नसल्याने करवसुलीसाठी पालिकेने वेगळा फंडा अवलंबला आहे. थकबाकीदारांच्या नावांची यादी करून त्याचे मोठमोठे फलक संपूर्ण शहरातील चौकाचौकात लावण्यात आले आहे. पालिकेने अचानक व अनपेक्षितपणे हे पाऊल उचलल्याने थकबाकीदार फलकावर आपली नावे वाचून अवाक् झाली आहेत. एवढय़ावरच प्रशासन थांबले नाही तर थकबाकीदारांना धडा शिकविण्यासाठी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा:यांनी थेट करवसुलीची धडक मोहीमही सुरू केली आहे. तसेच अनधिकृत नळ कनेक्शनला आळा घालण्यासाठी शहरातील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर ज्या लोकांकडे पाणीपट्टी बाकी आहे त्यांचे कनेक्शन बंद करण्यात येत आहे. जर त्यांनी 31 मार्चर्पयत कर भरणा केला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी व शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी 100 टक्के करवसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र, करवसुली आतार्पयत 81 टक्के झाली असून 19 टक्के मार्चअखेर्पयत वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेचे वसुली अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनदेखील काही थकबाकीदार दादच देत नव्हते, त्यामुळे पालिकेने ही धडक मोहीम सुरू केली आहे.
शनिवारी मध्यरात्री संपूर्ण शहरात थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले. यात भुसावळ रोड, जळगाव रोड, पाचोरा रोड, पालिका चौक, अराफत चौक, जामनेर पुरा, विविध वॉर्ड, कॉलनी भागात हे फलक लावण्यात आले आहे. सकाळ उजाडताच नागरिकांना हे फलक दिसल्याने थकबाकीदारांची नावे वाचण्यासाठी ठिकठिकाणी लोक गर्दी करीत होते. दिवसभर याबाबत चर्चेला उधाण आले होते.
(वार्ताहर)
अवैध व थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले
जामनेर नगरपालिका कर्मचा:यांनी रविवारी शहरात ठिकठिकाणी कारवाई करीत 25 अवैध नळ कनेक्शन तोडले. तर 15 थकबाकीदारांचे नळ कनेक्शनही बंद केले. दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा करणा:या नळ कनेक्शनवरून अनधिकृतपणे कनेक्शन घेणा:यांनाही दणका बसावा म्हणून 18 ठिकाणचे सार्वजनिक नळ कनेक्शन तोडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या कारवाईचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत होत असून बेकायदा नळ कनेक्शनचा वापर करणा:यांचे धाबे दणाणले आहे.
31 मार्चर्पयत सर्व थकबाकीदारांनी कराची रक्कम भरावी व नगरपालिकेला सहकार्य करावे. कराची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शोभा बाविस्कर
न.पा. मुख्याधिकारी