श्रीराम विद्यालय येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:31+5:302021-06-06T04:12:31+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित मेहरुण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे रवींद्र पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, अशोक लाडवंजारी यांच्याहस्ते शाळेच्या प्रांगणात ...
जागतिक पर्यावरण दिनानिमित मेहरुण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे रवींद्र पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, अशोक लाडवंजारी यांच्याहस्ते शाळेच्या प्रांगणात पिंपळाचे, कडूलिंब, गुलमोहर असे २५ वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. यावेळी विलास भदाणे, सलीम इनामदार, अनिल सोनवणे, शबाना बी, मुख्याध्यापक दिवाकर जोशी, सलमान खाटीक, नईम खाटीक, दिनेश पाटील, अमित तडवी, संतोष चाटे, शिक्षिका संध्या कुलकर्णी, शन्नो पिंजारी, प्रतिभा पाटील, जयश्री तायडे, संजय बडगुजर आदी उपस्थित होते.
===========
फोटो : ४.५२ वाजेचा मेल
वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहरात वृक्षारोपणाचा कार्यकम घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सचिव वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, दादा राठोड, स्वप्नील पाटील, गिरीश बिराडे, नारायण अटकोरे, प्रवीण इंगळे, किरण पाटील, संजय शिंदे, किरण चव्हाण, मोसिन शेख, झुबेर खान आदी उपस्थित होते.
============
फोटो : ५.०१ वाजेचा मेल
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वृक्षारोपण
खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, प्राचार्य अशोक राणे, उपप्राचार्य केतन चौधरी, प्रा.नीलेश जोशी, प्रा.प्रवीण कोल्हे, प्रा.संदीप केदार, प्रा.पंकज पाटील, मोहन चौधरी, शैलेश कुलकर्णी, शरद सोनार, नीलेश नाईक, केतन पाटील, अमोल गोमटे आदी उपस्थित होते.
=============
फोटो : ५.०१ वाजेचा मेल
ओरियन सीबीएसई स्कूल
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ओरियन सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूल येथे प्राचार्या सुषमा कंची व उपप्राचार्या माधवीलता सिट्रा यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी शाळेचे कर्मचारी वृंद व इतर शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.
=============
फोटो : ५.०३ वाजेचा मेल
मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन
मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिन निमित्त वृक्षा रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, हेमंत सोनार, मनोज भालेराव, सोपान मास्टर, मोनाली कुमावत, गणेश जोशी, गोपाळ पाटील, प्रशांत जोशी आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रशांत पाटील, गजानन पाटील, अभिजित काळे यांनी परिश्रम घेतले. तसेच या उपक्रमाला निखिल ठक्कर, अमित माळी, चंद्रशेखर कापडे यांचे सहकार्य लाभले.