पर्यावरणदिनी जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:45+5:302021-06-06T04:12:45+5:30

जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन प्लॅस्टिक पार्क, जैन हिल्स, जैन फूडपार्क व टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क अशा विविध आस्थापनांमध्ये ...

Plantation in various establishments of Jain Irrigation on Environment Day | पर्यावरणदिनी जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण

पर्यावरणदिनी जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण

Next

जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन प्लॅस्टिक पार्क, जैन हिल्स, जैन फूडपार्क व टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क अशा विविध आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कंपनीचे अधिकारी व सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपण केवळ इव्हेंटपुरता न ठरता खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे जतन करण्यासाठी वृक्ष जगविण्याचा संकल्प कंपनीच्या सहकाऱ्यांनी घेतला.

जैन प्लॅस्टिक पार्क

जैन प्लॅस्टिक पार्क येथे भोकर, शिरम, कांचन, नीम, वड आदींचे वृक्षारोपण केले. आर.एच. काकडे, अतिनकुमार त्यागी, योगेश बाफना, व्ही.एम. भट, ए.ओ. मुंगड, हेमंत तारकर, राजश्री पाटील, आनंद बलोदी, सुरेंद्र नारखेडे आदी उपस्थित होते.

टिश्युकल्चर पार्क

टिश्युकल्चर पार्क इ ब्लॉकमध्ये ५० वृक्षांचे रोपण केले. फायटो सॅनेटायझेशनचे इन्स्पेक्टर डॉ. राम सिंग यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी विजयसिंग पाटील, के.बी. पाटील, सेक्युरिटी ऑफिसर इंद्रकुमार सिंग आदी उपस्थित होते.

जैन फूड पार्क व जैन हिल्स

जैन व्हॅली येथील ईसीआरसी वेअर हाऊसच्या परिसरात १५० रोपे लावण्यात आले. एस.डी. गुप्ता, डी.जे. शितोळे, जी.आर. पाटील, जी.आर. चौधरी, एस.बी. ठाकरे, बी.व्ही. बडगुजर, प्रमोद शिंदे, दीपक कापसे, योगेश पवार आदी उपस्थित होते. जैन हिल्स येथे देखील सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल ढाके, डॉ. बी.के, अजय काळे, रवी कमोद, संजय सोनजे, प्रसाद साखरे आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation in various establishments of Jain Irrigation on Environment Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.