अमळनेरात युवा मंडळातर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:03 IST2018-08-18T16:02:51+5:302018-08-18T16:03:25+5:30

मंडळाने विधायक उपक्रम राबवावे : पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर

Plantation by the Yuva Mandal in Amalner | अमळनेरात युवा मंडळातर्फे वृक्षारोपण

अमळनेरात युवा मंडळातर्फे वृक्षारोपण


अमळनेर, जि.जळगाव : संत गजानन महाराज संस्था अंतर्गत अमळनेर येथे युवा सांस्कृतिक मंडळ सुरू झाले आहे. या सांस्कृतिक मंडळाच्यावतीने समाज विधायक उपक्रम राबवावे. सध्या युवा पिढी भ्रमणध्वनीचा अधिक वापर करून व्यसनाधिनतेकडे वळली आहे. यासाठी युवा सांस्कृतीक मंडळाने उपक्रम राबवून समाजप्रबोधन करावे, अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मंडळाचे उद्घाटन व वृक्षारोपणप्रसंगी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गजानन संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार होते. प्रमुख अतिथी महेश पाटील, एस.व्ही.पाटील, प्रविण पवार, संजय साळुंखे, ज्योती पवार होते. प्रास्ताविक एल.जे.चौधरी यांनी केले.
सांस्कृतिक मंडळाचे सल्लागार भूषण चौधरी यांनी युवा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कायार्ला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.
या वेळी संत गजानन महाराज परिसरात वृक्ष लागवड पो.नि.बडगुजर यांच्याहस्ते करण्यात आली.
या वेळी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माधवराव महाजन, उपाध्यक्ष संजय पाटकरी, सचिव कवीश पाटील, खजिनदार विजय येवले, सदस्य जगदीश सोनवणे, परेश पाटील, रोहित पवार, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अतुल महाजन, रोशन पाटील, सल्लागार ईश्वर महाजन, भूषण चौधरी, वैद्यकीय सल्लागार डॉ.घनश्याम पाटील, अ‍ॅड.धनंजय चव्हाण, आध्यात्मिक सल्लागार नितीन भावे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आभार संजय पाटकरी यांनी मानले. यावेळी गजानन भक्त महिला व पुरुष उपस्थित होते.

Web Title: Plantation by the Yuva Mandal in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.