वृक्ष लागवड फक्त कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 08:50 PM2020-09-27T20:50:36+5:302020-09-27T20:50:48+5:30

बोदवड तालुक्यातील चित्र : साठ हजार झाडाच्या जागी साठही झाडे दिसेना

Planting trees only on paper! | वृक्ष लागवड फक्त कागदावरच !

वृक्ष लागवड फक्त कागदावरच !

googlenewsNext


बोदवड : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत राबवलेल्या तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचा फज्जा उडल्याचे चित्र शेलवड येथील गायरान जागेवरून उघड होताच तालुक्यातही अन्य ठिकाणी सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवडीचा फज्जा उडाल्याचे तक्रारी समोर येत आहेत.
शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी एका हेक्टर जागेवर २ हजार ५०० झाडे सतत तीन वर्षे जगवण्याचा संकल्प असून ग्२०१९ या वर्षी गट क्रमांक १६६ वर सुमारे २० हेक्टर जागेत सामाजिक वनीकरण विभाग व ग्राम पंचायत यांनी सुमारे साठ हजार आठशे झाडे जगवण्याचे, उद्दिष्ट दाखवले परंतु आज या घडीला या गटात साठही झाडे जगलेली दिसत नसून या भोंगळ कारभारची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान तालुक्यात गेल्यावर्षी नाडगाव ते चिंचखेड या दहा किमी रस्त्यावर पाच हजार झाडे, साळशिंगी भांनखेड रस्त्यावर एक हजार झाड लावली.
याबाबत सामाजिक वनीकरणचे प्रभारी अधिकारी जे. इ. धांडे यांनी सांगितले की, माझ्याकडे अतिरिक्त पदभार आहे व मी नवीनच रुजू झालो असून याबाबत माहिती नाही, उद्या पूर्ण माहिती देतो.

Web Title: Planting trees only on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.