गिरणा नदीच्या काठावर दोन हजार 'सीड्स बॉल'चे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:23+5:302021-06-24T04:12:23+5:30
जळगाव : १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन व चेतना व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गिरणा नदीच्या काठावर गुरूवारी तब्बल दोन ...
जळगाव : १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन व चेतना व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गिरणा नदीच्या काठावर गुरूवारी तब्बल दोन हजार 'सीड बॉल'चे रोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरूवात होईल.
शासनाच्यावतीने वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. मात्र, आता वृक्ष संवर्धनासाठी एनसीसी छात्र सैनिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन २० छात्र सैनिकांनी बेल, रिठा, भोकर, नीम, चिंच तसेच जांभुळ, करवंद या वृक्षांचे सीड्स बॉल तयार केले आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता या दोन हजार सीड्स बॉलचे गिरणा नदी काठावर रोपण केले जाईल. एवढेच नव्हे तर ५० वड वृक्षाच्या रोपांचे देखील रोपण केले जाणार आहे. यावेळी कर्नल प्रवीण धिमण, सुभेदार मेजर कोमलसिंग, लेफ्टनंट योगेश बोरसे यांच्यासह एनसीसी छात्र सैनिकांचा या उपक्रमात सहभाग असेल.