प्लॅस्टिकबंदीचा कापड व्यवसायाला फटका; साड्या, कपड्यांवर धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:34 PM2018-06-29T12:34:15+5:302018-06-29T12:35:49+5:30

हाताळल्याने डाग लागून माल पडून राहण्याची भीती

Plastics clash erupts business; Sleeves, dust on clothes | प्लॅस्टिकबंदीचा कापड व्यवसायाला फटका; साड्या, कपड्यांवर धूळ

प्लॅस्टिकबंदीचा कापड व्यवसायाला फटका; साड्या, कपड्यांवर धूळ

Next
ठळक मुद्देबंदीबाबत अधिकारी-कर्मचारीच संभ्रमातप्लॅस्टिक काढून विक्री

विजयकुमार सैतवाल
जळगाव : प्लॅस्टिकबंदीमुळे साड्या, तयार कपडे प्लॅस्टिकमध्ये ठेवण्यास अडचणी येऊ लागल्या असून त्याचा कापड व्यवसायास मोठा फटका बसत असल्याचे चित्र कापड बाजारात आहे. यामुळे कपड्यांवर धूळ बसण्यासह ग्राहकांनी हाताळल्याने त्यास डाग लागून ते खराब होण्याची भीती असल्याने कापड व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगून त्याचे स्वागतही केले जात आहे. मात्र त्याचा विविध व्यवसायावर परिणाम होऊ लागल्याचेही चित्र आहे. यामध्ये या बंदीचा थेट परिणाम कापड व्यवसायावरही होत आहे. कापड व्यवसायातील साड्या असो की तयार कपडे यावर धूळ बसू नये व ग्राहकांना दाखविताना त्यास हात लागून ते खराब होऊ नये म्हणून ते प्लॅस्टिकमध्येच ठेवावे लागतात. मात्र कपड्यांचे धूळ-मातीपासून संरक्षण करणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी आल्याने कापड व्यावसायिक चिंतीत आहेत.
बंदीबाबत अधिकारी-कर्मचारीच संभ्रमात
प्लॅस्टिकबंदीमध्ये कोणत्याही आवरणासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक ५० मायक्रॉनपेक्षा जास्त असावे, असे निर्देश आहे. त्यानुसार साड्या, कपडे यांचे आवरण हे ५० मायक्रॉनपेक्षा जास्तच असते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. असे असले तरी कारवाई करताना हे प्लॅस्टिकही चालणार नाही, असे सांगून अधिकारी, कर्मचारी या प्लॅस्टिक वापराबाबतही बंदी घालत असल्याच्या तक्रारी काही व्यावसायिकांच्या आहे. नेमके कोणते प्लॅस्टिक अथवा नॉन व्होन बॅग चालतील याबाबत अधिकारी, कर्मचारीच संभ्रमात असल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कपडे खराब झाल्यास काय करावे
प्लॅस्टिकबंदीत साड्या, तयार कपडे, शेरवाणी, कोट, अशा महागड्या कपड्यांसह सर्वच कपड्यांवरील प्लॅस्टिक आवरण काढण्यास सांगितले जात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. हे आवरण काढल्यास या महागड्या कपड्यांवर धूळ बसून ते खराब होऊ शकतात. सोबतच दररोज ग्राहकांना दाखविताना ते दिवसातून कितीतरी वेळा हाताळले जाऊन त्यास डाग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा खराब झालेल्या साड्या, कपडे ग्राहक घेणार नाही की कंपनी परत घेणार नाही, त्यामुळे त्यांचे काय करावे, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे पडला आहे.
प्लॅस्टिक काढून विक्री
स्थानिक अधिकारी-कर्मचारी संभ्रमात असले तरी कापड विक्रीबाबत इतर शहरातील संघटनांकडून आलेल्या सूचनांनुसारप्लॅस्टिक बाहेर जाऊ नये म्हणून व्यावसायिकानीच साडी, कपडे विक्री नंतर ते देताना त्यावरील आवरण काढून घ्यावे असे सूचित करण्यात आले आहे.
ग्राहक नाराज
व्यावसायिक वेठीस, संभ्रमाबाबत पालकमंत्र्यांना साकडे
कारवाई करताना अधिकारी-कर्मचारी दुकानात आल्यानंतर एखाद्या गुन्हेगाराच्या घर अथवा दुकानाची झडती घेतात, त्याप्रमाणे झडती घेत असल्याचा आरोप एका व्यावसायिकाने केला आहे. दोन दिवसांपूर्वीच दुकानातील सर्वत्र शोधाशोध करीत वेठीस धरण्यात आल्याचा प्रकार घडल्याने संबंधित व्यावसायिकाने थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून अधिकाºयांना कशावर बंदी आहे व कशावर नाही याबाबत सूचना देण्याची विनंती केली.

कापड व्यवसायातील प्लॅस्टिकचे आवरण काढल्यास साडी व इतर कपड्यांवर धूळ बसण्यासह ग्राहकांनी हाताळून ते खराब होतील. त्यामुळे त्यांचे काय करावे, असा प्रश्न आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत अधिकारी, कर्मचाºयांचा संभ्रम दूर होणे गरजेचे आहे.
- भरत समदडिया, कापड व्यावसायिक.

प्लॅस्टिकबंदीमुळे कपडे, साड्या खराब होण्याची भीती असून यामुळे ग्राहकही नाराजी व्यक्त करीत आहे. खराब माल ग्राहकही घेणार नाही व त्याचा फटका व्यावसायिकांनाच बसेल.
- किरण फिरके, कापड व्यावसायिक.

Web Title: Plastics clash erupts business; Sleeves, dust on clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.