प्लॅटफार्म तिकीट आता ५० रूपये, तरी स्टेशनवरील गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:10+5:302021-03-13T04:29:10+5:30

जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या स्टेशनवरील प्लॅटफार्म तिकीट १० रूपये वरून, ५० रूपये केले ...

Platform tickets now cost Rs 50, but the crowd at the station did not subside | प्लॅटफार्म तिकीट आता ५० रूपये, तरी स्टेशनवरील गर्दी ओसरेना

प्लॅटफार्म तिकीट आता ५० रूपये, तरी स्टेशनवरील गर्दी ओसरेना

Next

जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या स्टेशनवरील प्लॅटफार्म तिकीट १० रूपये वरून, ५० रूपये केले आहे. मात्र, तरीदेखील स्टेशनवर जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाही. सध्या कोरोना काळातही स्टेशनवर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातलगांची गर्दी दिसून येत आहे. जळगाव स्टेशनचे ११ मार्चपासून ५० रुपये प्लॅटफार्म तिकीट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी २०० जणांनी हे तिकीट काढल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जवळच्या नातलगांना स्टेशनवर सोडण्यासाठी अनेक नागरिक प्लॅटफार्मवर जात असतात. यासाठी प्लॅटफार्म तिकीट काढणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या आधी या तिकीटाची किंमत १० रूपये होती. मात्र, सध्या कोरोना काळात १० जून पर्यंत हे तिकीट ५० रूपये करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्रभूमीवर स्टेशनवर येणाऱ्यांची संख्या कमी व्हावी, यासाठी प्लॅटफार्मचे तिकीट दर १० रुपयांवरून ५० रूपये करण्यात आले आहे. काही कालावधी पुरता ही दरवाढ असली तरी, नागरिक वाढलेल्या किंमतीचा विचार न करता ५० रूपये प्रमाणे तिकीट काढुन, प्लॅटफार्मवर जातच आहेत. सध्या गाड्यांची संख्या कमी असली, तरी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यांना सोडण्यासाठी गुरूवारी २०० नागरिकांनी प्लॅटफार्म तिकीट काढले. तर शुक्रवारी दुपारपर्यंत ५० हून अधिक जणांनी तिकीट काढले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वाढविलेल्या दराचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दररोज ३० रेल्वे धावत आहेत

सध्या कोरोनामुळे पॅसेंजर गाड्या बंद असून, फक्त कोरोना स्पेशल गाड्याच धावत आहेत. यामध्ये जळगावला थांबणाऱ्या ३० सुपरफास्ट गाड्यांचा समावेश आहे. तसेच या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण बंधनकारक करण्यात आले आहे.

इन्फो :

दररोज २० हजार प्रवाशी प्रवास करतात

सध्या कोरोना काळात मोजक्याच गाड्या धावत असल्यामुळे गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सध्या स्थितीला २० ते २२ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

पहिल्याच दिवशी २०० तिकीटांची विक्री

कोरोनामुळे रेल्वे प्रशासनातर्फे वर्षभरापासून प्लॅटफार्म तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली होती. ११ मार्चपासून या तिकीट विक्रीला पुन्हा सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ५० रूपये प्रमाणे २०० तिकीटांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. तर कोरोनाच्या पूर्वी दररोज ५०० ते ६०० प्लॅटफार्मची तिकीट विक्री होत असल्याचेही रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्लॅटफार्मचे तिकीट सध्या ५० रुपये करण्यात आले आहे. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. कोरोनापूर्वी दररोज प्लॅटफार्मची ५०० ते ६०० च्या वर तिकीट विक्री व्हायची. सध्या कोरोनामुळे प्रवाशांची काहीशी संख्या कमी झाली असली तरी, प्रवासी नातलगांना सोडण्यासाठी येतांना, नागरिक प्लॅटफार्म तिकीट काढल्यानंतरच स्टेशनावर येत आहेत.

अमरचंद अग्रवाल, स्टेशन प्रबंधक, जळगाव स्टेशन

इन्फो :

रेल्वे प्रशासनाने ५० रूपये प्लॅटफार्म तिकीट केल्यामुळे खिशाला भूर्दंड बसत आहे. स्टेशन मध्ये फक्त नातलगांना सोडण्यासाठी पाच मिनिटांचे काम असते, तरीदेखील रेल्वे प्रशासन ५० रूपये आकारणी करत असल्यामुळे, यात प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे.

गिरीश ढाकणे, प्र‌वासी

इन्फो :

जवळच्या प्र‌वाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येण्या शिवाय पर्याय नसतो. रेल्वे प्रशासनाने आता ५० रूपये प्लॅटफार्म तिकीट केल्यामुळे ते काढावे लागणार आहे. कोरोनामुळे ही दरवाढ केली असली, तरी ५० रूपयांपर्यंत दरवाढ योग्य नाही.

सतिश देसले, प्रवासी

Web Title: Platform tickets now cost Rs 50, but the crowd at the station did not subside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.