वर्षभरात पंधरा दिवस रात्री १२ पर्यंत वाजवा रे वाजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 08:43 PM2021-01-12T20:43:06+5:302021-01-12T20:43:18+5:30

जळगाव - जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री बारावाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्‍हाधिकारी अभिजित ...

Play till midnight fortnightly throughout the year | वर्षभरात पंधरा दिवस रात्री १२ पर्यंत वाजवा रे वाजवा

वर्षभरात पंधरा दिवस रात्री १२ पर्यंत वाजवा रे वाजवा

Next

जळगाव - जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री बारावाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सवलतीचा लाभ घेताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रात्री दहापर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी असते. परंतु, सण, उत्सवासाठी वर्षभरात १५ वेगवेगळ्या दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास सरकारने परवानगी दिली आहे. हे १५ दिवस कोणते, ते ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ याकाळात रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महाराष्ट्र दिवस (१ मे), गणेशोत्सव पाचवा दिवस (१४ सप्टेंबर), गणेशोत्सव सातवा दिवस (१६ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (१९ सप्टेंबर), नवरात्रोत्सव अष्टमी (१३ ऑक्टोबर), नवमी (१४ ऑक्टोबर), ईद ए मिलाद (१९ ऑक्टोबर), दिपावली (४ नोव्हेंबर) ख्रिसमस (२५ डिसेंबर), वर्षअखेर (३१ डिसेंबर) आदींचा समावेश आहे. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांच्या मान्‍यतेनुसार महत्‍वाच्‍या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे.

आदेशातील बाबींचे पालन करावे
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देताना उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सवलत राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहणार आहे.

 

Web Title: Play till midnight fortnightly throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.