जिल्हाधिकारी निवासस्थानात खेळले-बागडले मनपा शाळेचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:31 PM2019-08-17T12:31:54+5:302019-08-17T12:32:11+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनीही गायली मुलांसोबत गाणी

Played at District Collector's residence | जिल्हाधिकारी निवासस्थानात खेळले-बागडले मनपा शाळेचे विद्यार्थी

जिल्हाधिकारी निवासस्थानात खेळले-बागडले मनपा शाळेचे विद्यार्थी

Next

जळगाव : येता जाताना दिसणारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा बंगला अर्थात त्यांचे शासकीय निवासस्थान आतून असते तरी कसे, अशी सर्वांना उत्सुकता असते. याच उत्सुकतेत असणाºया विद्यार्थ्यांना हे निवासस्थाने पाहण्यास मिळाली ती स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर. विशेष म्हणजे ही संधी खुद्द जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनीच महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांच्यासोबत खेळत, गाणे गात त्यांना माहितीहील दिली.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे मोठमोठे शासकीय निवासस्थान बाहेरून सर्वच बघतात. मात्र ते आतून कसे आहे? याची उत्सुकता असते. विद्यार्थ्यांना हे निवासस्थान पाहता यावे व त्यांना प्रेरणा मिळून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी यासाठी त्यांना ही निवासस्थाने दाखविण्याचा उपक्रम स्वातंत्र्यदिनी राबविण्यात आला.
या बाबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, मी स्वत: जि.प. शाळेतून शिक्षण घेतलेले असल्याने मनपा, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी हुशारी असते. त्यांच्या या हुशारीला दाद मिळण्यासह त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जळगावातील महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासस्थान दाखविण्याचा निर्णय घेतला.
या वेळी विद्यार्थ्यांनी या परिसरात खेळण्याचा आनंद घेण्यासह गाणेही म्हटले. विशेष म्हणजे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही या विद्यार्थ्यांसोबत गाणे म्हणत त्यांच्यासोबत खेळात रमले. जिल्हाधिकाºयांनीच या विद्यार्थ्यांना निवासस्थातील विविध खोल्यांची, कक्षाची माहिती दिली.

Web Title: Played at District Collector's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव