‘नकुशी’ होऊ लागली हवीहवीशी, जळगावात सुखद चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:48 AM2018-05-04T11:48:05+5:302018-05-04T11:48:05+5:30

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढतोय

pleasant pictures in Jalgaon | ‘नकुशी’ होऊ लागली हवीहवीशी, जळगावात सुखद चित्र

‘नकुशी’ होऊ लागली हवीहवीशी, जळगावात सुखद चित्र

googlenewsNext
ठळक मुद्देधडक तपासणीमुळे धास्तीपाच वर्षाचा चढता आलेख

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठीची जनजागृती, सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग आणि डॉक्टरांवर होणारी कारवाई अशा विविध कारणांमुळे जळगाव जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दरवर्षी वाढतच असून ‘नकुशी’ आता हवीहवीशी होत असल्याचे सुखद चित्र जळगाव जिल्ह्यात आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता लिंग गुणोत्तर प्रमाण वाढतच गेल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
एकेकाळी गर्भनिदान करून गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असलेल्या जळगाव जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर चिंतेची बाब होती. गर्भनिदान व गर्भपात करण्याच्या कारणांमुळे जळगावातील अनेक रुग्णालयांवर कारवाईदेखील झाल्या आहेत. मात्र आता चित्र पालटू लागले असून दिवसेंदिवस मुलींची संख्या वाढत असल्याचे चित्र आकडेवारीवरून समोर येत आहे.
पाच वर्षाचा चढता आलेख
२०१३मध्ये प्रति हजारी मुलांच्या तुलनेत ८२५ मुली होत्या. ही संख्या आज ८९८वर पोहचली आहे. २०१३ नंतर एकाच वर्षात २५ने ही संख्या वाढून २०१४मध्ये प्रति हजारी ८५० मुली जन्माला आल्या. त्यानंतर २०१५मध्ये ८६१, २०१६मध्ये ८७२, २०१७मध्ये ८८१ मुली जन्माला आल्या.
धडक तपासणीमुळे धास्ती
जिल्ह्यात प्रसूतीपूर्व प्रसूती धारणा कायदा नियंत्रण सल्लागार समितीच्यावतीने (पीसीपीएनडीटी) जिल्ह्यात तपासणी होऊ लागल्याने डॉक्टरांमध्ये धास्ती निर्माण होऊन गर्भलिंग निदानास आळा बसण्यास मदत होत आहे. त्यामुळे निदान न झाल्याने गर्भपातासही आळा बसून मुलीही आनंदाने हे जग पाहू लागल्या आहेत.
तीन डॉक्टरांना शिक्षा
गेल्या सहा वर्षात या कायद्याचे उल्लंघन केल्याने तीन डॉक्टरांना शिक्षा झाली आहे. यामध्ये २०१२मध्ये एका डॉक्टराला तीन वर्षाची, २०१३मध्ये एक वर्षाची आणि २०१४मध्ये एका डॉक्टराला दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे आता सहजासहजी कोणी कायद्याचे उल्लंंघन करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे.
या सोबतच सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग, बेटी बचाव, बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या स्वावलंबन, पोषणाबाबतची जनजागृती यामुळेही मुलींच्या जन्मदर वाढीस चालना मिळत आहे.
२५ रोजी झाली बैठक
जिल्हास्तरावर असलेल्या पीसीपीएनडीटी समितीची बैठक २५ एप्रिल रोजी होऊन त्यात जिल्हाभरातील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील रुग्णालयांची अचानक तपासणी करण्याबाबत या वेळी सूचना करण्यात आल्या.

जिल्ह्यात वाढती जनजागृती व कारवाईच्या धास्तीने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होण्यास आळा बसत आहे. यामुळे मुलींचा जन्मदर वाढत असून सध्या ८९८वर असलेली मुलींची संख्या ९००च्यावरनेण्याचाप्रयत्नआहे.
-डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

Web Title: pleasant pictures in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.