अंतुर्ली परिसरातील शेत शिवाराच्या रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 03:12 PM2020-07-28T15:12:40+5:302020-07-28T15:12:47+5:30

शेतकऱ्यांचे होताय प्रचंड हाल

Plight of farm roads in Anturli area | अंतुर्ली परिसरातील शेत शिवाराच्या रस्त्यांची दुर्दशा

अंतुर्ली परिसरातील शेत शिवाराच्या रस्त्यांची दुर्दशा

Next

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : परिसरातील शेती शिवारातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात तर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे.
नरवेल- अंतुर्ली शिव हा रस्ता सुमारे दिड किमी सून या रस्त्यावर खड्डे पडल्याने पायी सुध्दा चालता येत नाही. बैलांच्याही पायाला जखमा होतात. नरवेल फाटा ते वारोळी शिव हा रस्ता पाच वषार्पूर्वी जि.प.ने केला होता या रस्त्याची सुध्दा बिकट अवस्था झाली आहे. त्याच प्रमाणे भामदरा नाल्यावल सुमारे दोनशे हेक्टर शेती असून या शिवारात तर रस्ते अतिशय खराब झाले आहेत. शेतात खते नेण्यासाठी खुपच त्रास सहन करावा लागतो. केळीच्या एका घडाची वाहतुक २० रूपये द्यावी लागते.

Web Title: Plight of farm roads in Anturli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.