चुकीच्या कामांसाठी जैन याच्या कार्यालयात शिजायचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:25+5:302020-12-08T04:13:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआरमधील चुकीच्या कामांसाठी सनदी अधिकारी महावीर जैन यांच्या कार्यालयातच कट शिजत होता. त्यासाठी संस्थेतील ...

A plot to cook in Jain's office for wrongdoing | चुकीच्या कामांसाठी जैन याच्या कार्यालयात शिजायचा कट

चुकीच्या कामांसाठी जैन याच्या कार्यालयात शिजायचा कट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआरमधील चुकीच्या कामांसाठी सनदी अधिकारी महावीर जैन यांच्या कार्यालयातच कट शिजत होता. त्यासाठी संस्थेतील कागदपत्रे जैन यांच्याकडे आणली जायची व तेथेच कंडारे, महावीर जैन व इतर बसून चुकीच्या कामांबाबत निर्णय घेत होते. लेखापरिक्षण सुरु असताना पत्रव्यवहार करुन जैन कंडारेला माहिती पुरवित असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या ठेवींच्या पावत्या गोळा करण्यासाठी कंडारेने एजंट नेमल्याचे देखील उघड झाले आहे. तपासात एका जणाचे नाव निष्पन्न झालेले आहे.

पथक नगरहून रिकाम्या हाताने परतले

या गुन्ह्यातील मास्टरमाईंड जितेंद्र कंडारे हा अहमदनगरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्याचा चालक कमलाकर कोळी याला घेऊन अहमदनगर गाठले असता तो तेथून निसटला होता. अहमदनगरमध्ये कंडारेचे जेथे जेथे वास्तव्य होते, तेथे पोलीस गेले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या कुणाल शहा यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्याच्या शोधासाठी एक पथक अहमदाबाद येथे गेले होते. पण तो देखील तेथून गायब झाल्याची माहिती प्राप्त झाली.

आज न्यायालयात दोषारोप ठेवण्याचे कामकाज

बीएचआरमधील अपहार, फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी प्रमोद रायसोनी व अन्य आरोपींवर दोषारोप ठेवण्याचे कामकाज मंगळवारी जळगाव जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात होणार आहे. अटकेतील आरोपींना कारागृहातूनच व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार आहे.

Web Title: A plot to cook in Jain's office for wrongdoing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.