रायगडच्या महिलेची प्लॉट विक्रीत फसवणूक, साकेगावच्या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:26 AM2018-10-13T00:26:58+5:302018-10-13T00:27:34+5:30

प्लॉट नावावर नसताना डमी महिला उभी करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी साकेगाव येथील पाच ठगांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

 The plot of the woman in Raigad, cheating in the sale, the five accused of Saykigaon court judicial custody | रायगडच्या महिलेची प्लॉट विक्रीत फसवणूक, साकेगावच्या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी

रायगडच्या महिलेची प्लॉट विक्रीत फसवणूक, साकेगावच्या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्देदुसऱ्याच्या नावावरील प्लॉट-खरेदी विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यतापोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा

भुसावळ, जि.जळगाव : प्लॉट नावावर नसताना डमी महिला उभी करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी साकेगाव येथील पाच ठगांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा विकास सोनवणे (वरसे, ता.रोहा, जि.रायगड) यांचा सर्वे नंबर २६९/१ अ,ब व क मधील अकृषिक प्लॉट नं. ५४मधील १८५.८० मीटर चौरस प्लॉट हा ९ जानेवारी २००१ते वेळ व तारीख नक्की नाही. दरम्यान, आरोपींनी संगनमत करून विकला. सीमा सोनवणे यांच्या जागी संगीता सोनवणे यांना डमी उभे करीत बनावट स्वाक्षरी व पुरावे तयार केले. या प्रकरणी संशयीत आरोपी राकेश नथ्थू सोनवणे (४५), संगीता विकास सोनवणे (४५), ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास शांताराम धनगर (४२), ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई अशोक काशिनाथ कोळी (४०), साकेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संगीता भोळे यांचे दिर नरेंद्र एकनाथ भोळे (५०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. आरोपींना तालुका पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपींवर भादवि कलम ४२०, ४२३, ४२४, ४६५, ४६६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपासात प्लॉट खरेदी-विक्री संदर्भातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश वैद्य करीत आहेत.



 

Web Title:  The plot of the woman in Raigad, cheating in the sale, the five accused of Saykigaon court judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.