जळगावात दोन हजार उद्योजकांकडून भूखंडांची मागणी
By admin | Published: May 13, 2017 05:41 PM2017-05-13T17:41:33+5:302017-05-13T17:41:33+5:30
250 एकर जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 13 - जळगावातील एमआयडीसीचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी सुप्रिम कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या 250 एकर जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या जागेवर 2 हजार उद्योजक उद्योग उभारण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
एमआयडीसीच्या विस्तारीकरणाची मागणी उद्योजक संघटना व उद्योजकांकडून होत आहे. या संदर्भात गुरुवारी मंत्रालयात जळगाव येथील उद्योगाच्या अडचणींबाबत ‘जिंदा’ संघटनेचे पदाधिकारी व एमआयडीसीच्या अधिका:यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जळगाव औद्योगिक क्षेत्रालगतची महसूल विभागाची 250 एकर जमीन जळगाव एमआयडीसीच्या विस्तारासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाने तयार करावा, असे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.
एमआयडीसी च्या विस्तारीकरणाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत कुसुंबा शिवारातील 250 एकर जागेचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे. आता ही जागा संपादित करण्याचे काम शासनाचे आहे. या विस्तारीकरण केल्या जाणा:या जागेवर उद्योग उभारणीसाठी उद्योजक उत्सुक असून 2 हजार उद्योजकांचे प्रस्ताव आले आहेत.
-किरण राणे, उपाध्यक्ष, ‘जिंदा’ संघटना