अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

By admin | Published: January 25, 2017 12:58 AM2017-01-25T00:58:56+5:302017-01-25T00:58:56+5:30

पंतप्रधान आवास योजना : सायबर कॅफेवर परस्पर भरून घेतले जाताहेत अजर्; घाई न करण्याचे मनपाचे आवाहन

The plunder of citizens in the name of filling in the application | अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

Next

जळगाव : पंतप्रधान आवास योजनेसाठी मनपाने सव्रेक्षण करून अजर्भरून घेण्यासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली असून त्या मक्तेदाराकडून 6 फेब्रुवारीपासून सव्रेक्षणाच्या कामास प्रारंभ होणार आहे. मात्र काही सायबर कॅफे चालकांनी तसेच सुविधा केंद्रांनी आधीच परस्पर नागरिकांकडून 150-200 रूपये घेऊन अजर्भरून घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र ते अजर्थेट शासनाच्या वेबसाईटवर जात असल्याने त्याचा उपयोग होणार नसून नागरिकांना विनाकारण भरुदड बसणार आहे. त्यामुळे मनपाने नेमलेल्या मक्तेदाराकडून सव्रेक्षण सुरू होईल, तेव्हाच त्याच्याकडे अजर्भरून देण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
महिनाअखेर मागविले दोन प्रस्ताव
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपाकडून किमान दोन परिपूर्ण प्रस्ताव या महिनाअखेर शासनास सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मनपाला केले आहेत. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीर्पयत लागू असल्याने त्यानंतरच या प्रस्तावाबाबत मनपात चर्चा होऊन प्रस्ताव पाठविणे शक्य होणार आहे. दरम्यान या योजनेत संबंधीत लाभार्थीला त्याचा हिस्सा भरावयाचा असून त्याची संमतीही योजनेत सहभागासाठी आवश्यक असल्याने योजनेच्या यशस्वीतेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
या योजनेतील लाभाथ्र्याच्या सव्रेक्षणासाठी मनपाने मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. हा मक्तेदार सव्रेक्षण करून लाभार्थ्ीकडून अर्ज भरून घेणार असून, पूर्ण योजनेचा डीपीआर तयार करणार आहे. दरम्यान शासनाकडून या योजनेला गती देण्यासाठी मनपाकडून महिनाअखेरच किमान दोन जागांवरील योजनेचे प्रस्ताव मागविले आहेत. मात्र जागांच्या संदर्भात महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व गटनेते यांच्यात चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याने आचारसंहितेनंतरच ते शक्य होणार आहे. तसेच नगरसेवकांसमोरही योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे.
मनपा सुरू करणार केंद्र
पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मनपाकडून चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यात प्रभाग समिती 1 अंतर्गत डॉ.मुखर्जी उद्यानातील युनिट कार्यालय, तसेच प्रभाग समिी क्र.2, 3 व 4 च्या कार्यालयात 6 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेर्पयत हे अर्ज स्विकारले जाणार                 आहेत.
दोन प्रकारात योजना
या योजनेत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्ीना 30 चौरस मीटर तर अल्प उत्पन्न गटासाठी 60 चौरस मिटरचे घर मिळणार आहे.

Web Title: The plunder of citizens in the name of filling in the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.