एज्युकेशन वर्ल्डच्या क्रमवारीत पोदार स्कूल प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 09:54 PM2020-12-21T21:54:47+5:302020-12-21T21:55:06+5:30
जळगाव : दिल्लीतील एज्युकेशन वर्ल्डने नुकतीच वार्षिक एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यात देशातील २ ...
जळगाव : दिल्लीतील एज्युकेशन वर्ल्डने नुकतीच वार्षिक एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यात देशातील २ हजार शाळांना रँकिंग देण्यात आले असून त्यात जळगावातील पोदार इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शाळेतील नीती आयोग, एटीएल अभ्यासक्रम, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थी स्वास्थ बैठक, परिसवांद, शिस्त नियमनासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक दर्जा यासह विविध बाबींचा विचार करून पोदार इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलला हा सन्मान देण्यात आला आहे. शाळेच्या या यशाबद्दल पवन पोदार, गौरव पोदार, हर्ष पोदार यांनी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन, उमा वाघ, रूपेश घाटगे, जितेंद्र कापडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.