शेंगा विक्रेत्याचा मोबाइल लॉजमधून लांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:05+5:302021-06-09T04:21:05+5:30
भुसावळ : रेल्वेत शेंगा विक्री करून उदरनिर्वाह करणार्या विक्रेत्याचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवल्याप्रकरणी अकोल्याच्या इसमाविरुद्ध बाजारपेठ ...
भुसावळ : रेल्वेत शेंगा विक्री करून उदरनिर्वाह करणार्या विक्रेत्याचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवल्याप्रकरणी अकोल्याच्या इसमाविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन रमेश गायकवाड (रा. श्री लॉज, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. ते भुसावळ ते इगतपुरीदरम्यान शेंगा विक्री करून उदरनिर्वाह करतात. २३ मे रोजी रात्री नऊ वाजता ते शहरातील श्री लॉजमध्ये मुक्कामाला होते. पहाटे त्यांनी मोबाइल चार्जिंगला लावला, मात्र काही वेळातच तो गायब झाल्याने त्यांनी लॉज मालक व उतारू यांच्याकडे विचारणा केली, मात्र मोबाइल आढळला नाही. लॉज मालकाने संशयित आरोपी अर्जुन बेलप्पा वाणी (रा. एस.टी. चौक, हिंदू धर्मशाळा, अकोला) हा चेकआऊट न करता निघून गेल्याची माहिती दिल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला, मात्र तो न झाल्याने संबंधितानेच मोबाइल चोरल्याची खात्री झाली. त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुषार केशव पाटील करीत आहेत.