विद्यापीठात उद्या काव्य वाचन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:45+5:302021-09-26T04:17:45+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने हिंदी पंधरवड्या निमित्त ...

Poetry reading competition tomorrow at the university | विद्यापीठात उद्या काव्य वाचन स्पर्धा

विद्यापीठात उद्या काव्य वाचन स्पर्धा

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने हिंदी पंधरवड्या निमित्त दि.२७ सप्टेबरला राष्ट्रीय पातळीवारील ऑनलाईन काव्य वाचन आणि २९ व ३० सप्टेबरला राष्ट्रीय शोधनिबंध वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदी पंधरवडा आणि भारती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त होत असलेल्या या स्पर्धेत पदवी आणि पदव्युत्तरस्तरावरील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि नवोदित कवी भाग घेऊ शकतील. या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम विजेत्यास प्रत्येकी तीन हजार रूपये, द्वितीय विजेत्यास दोन हजार रूपये व तृतीय विजेत्याला एक हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल. काव्य वाचन स्पर्धेतील कविता स्वरचित आणि राष्ट्रीय भावनेशी निगडीत असावी. तर शोधनिबंध वाचनासाठी ‘स्वतंत्रता संग्राम में भारतीय भाषाओंका योगदान’ हा विषय देण्यात आला असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्पर्धेचे नियम व अटी देण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्रशाळेच्या संचालक प्रा.मुक्ता महाजन, हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी व स्पर्धा संयोजक डॉ.प्रिती सोनी, प्रा. मनिषा महाजन यांनी दिली.

Web Title: Poetry reading competition tomorrow at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.