रावेर येथे ८० मेढ्यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:26 PM2018-04-11T17:26:02+5:302018-04-11T17:26:02+5:30
रावेर येथे केळी बागेतील विद्राव्य रासायनिक खत मिश्रीत पाणी प्राशन केल्याने सुका धोंडू ठोंबरे व मुळा चिंधू वरकटे (रा.अहिरवाडी) या मेंढपाळांच्या ८० मेंढ्यांना विषबाधा होवून त्या मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी घडली.
आॅनलाईन लोकमत
रावेर,दि.११ : रावेर येथे केळी बागेतील विद्राव्य रासायनिक खत मिश्रीत पाणी प्राशन केल्याने सुका धोंडू ठोंबरे व मुळा चिंधू वरकटे (रा.अहिरवाडी) या मेंढपाळांच्या ८० मेंढ्यांना विषबाधा होवून त्या मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी घडली.
रावेर शिवारात रमेश नामदेव महाजन (रा.शिंदखेडा) यांच्या विहीरीवरील व्हेन्च्युरीतील खतमिश्रीत पाणी प्राशन केल्याने ही घटना घडली. पाणी प्राशन केल्यानंतर सुका ठोंबरे व मुळा वरकटे यांच्या मालकीच्या मेंढ्या राकेश नेमाडे यांच्या शेतात मृत्युमुखी पडल्या आहेत. रावेर पं.स.चे पशुधन पर्यवेक्षक डॉ.एस.एम.राठोड व डॉ.जी.एस. पाटील औषधोपचार करीत आहेत. तहसीलदार विजयकुमार ढगे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, जि प माजी सभापती सुरेश धनके घटनास्थळी भेट देत मेंढपाळ कुटूंबीयांचे सांत्वन केले. सदर मेंढपाळांच्या चार लाख रुपये चे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे.