कु-हा काकोडा येथे कीटकनाशकाची फवारणी करताना शेतक-यास विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:57 PM2018-01-28T23:57:44+5:302018-01-28T23:57:56+5:30

गव्हावर फवारणी

Poisoning of the farmer at KurHa Kakoda | कु-हा काकोडा येथे कीटकनाशकाची फवारणी करताना शेतक-यास विषबाधा

कु-हा काकोडा येथे कीटकनाशकाची फवारणी करताना शेतक-यास विषबाधा

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकोडा येथे शेतामध्ये कीटकनाशकाची फवारणी करीत असताना राजेश गणेश कांडेलकर (20, रा. कु-हा काकोडा) या तरुणास विषबाधा झाली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
राजेश कांडेलकरचे कु-हा काकोडा गावानजीक शेत असून त्याच ठिकाणी घरदेखील आहे. रविवारी सकाळी राजेश शेतात लावलेल्या गव्हावर फवारणी करीत होता. त्या वेळी त्याला अचानक चक्कर आले. घरात ही बाब लक्षात येताच राजेशला कु-हा येथे खाजगी रुग्णालयात व तेथून मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथूनही त्यास जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार दुपारी राजेश कांडेलकर यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

Web Title: Poisoning of the farmer at KurHa Kakoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.