बुलडाणा जिल्ह्यातील तरुणाचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई मंदिरात विषप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:48 AM2018-05-13T11:48:04+5:302018-05-13T11:48:04+5:30
जिल्हा रुग्णालयात दाखल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुठा येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर शालीग्राम धांडे (२२) या तरुणाने मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदीराच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या घटनेत धरणगाव येथील सुदर्शन रूपचंद चौधरी (६३)या वृद्धाने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांना नातेवाईक व मित्र मंडळींनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुठा येथील धांडे कुटुंबीयांनी मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वर धांडे याने मंदिर परिसरात विष प्राशन केले. विष घेतल्याचे लक्षात येताचा नातेवाईकांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.