कमळगाव येथे गुरांना दूषित पाण्यातून विषबाधा
By admin | Published: March 31, 2017 04:18 PM2017-03-31T16:18:50+5:302017-03-31T16:18:50+5:30
कमळगाव, ता.चोपडा येथील गुरांना विषबाधा झाल्याने 9 गुरे आजारी पडली यातील एक गाय व एका म्हैस दगावली आहे
Next
गाय व म्हैस दगावल्याने लाखाचे नुकसान
चोपडा, दि.31 - कमळगाव, ता.चोपडा येथील गुरांना विषबाधा झाल्याने 9 गुरे आजारी पडली यातील एक गाय व एका म्हैस दगावली आहे यामुळे शेतक:याचे एका लाखाचे नुकसान झाले आहे. अन्य गुरांवर वेळीच उपचार झाल्याने 7 गुरे वाचविण्यात यश आले आहे.
गुरुवार 30 रोजी नेहमी प्रमाणे ही गुरे चराई साठी शेतात गेली होती, सायंकाळी घरी आल्यानंतर पशु मालकांनी त्यांना गोठय़ात बांधले होते, या ठिकाणी अचानक या गुरांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर पशु संवर्धन अधिका:यांनी तत्काळ उपचार सुरू केले.
रात्री 9 वाजता यातील विलास रामसिंग धनगर , रविद्र रामसिंग धनगर यांच्या मालकीची एक गाय व एक म्हैस दगावली आहे. चोपडा तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय गुजराथी, अडावदचे डॉ नितीन सोनवणे , डॉ भूषण चौधरी, डॉ रामचंद्र सोनवणे व डॉ लाखीचंद महाजन यांनी या गुरांवर रात्रभर उपचार केल्याने सात गुरे वाचविण्यात यश आले.
शुक्रवारी सकाळी 9 वाजता पशुसंवर्धन अधिका:यांच्या पथकाने धनगर यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता तेथील एका डबक्यात असलेले दुषित पाणी प्यायल्याने या गुरांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे
कमळगाव येथील शेतक:यांचे 60 हजार रुपये किमतीची म्हैस व 50 हजार रुपये किमतीची गाय असा एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या नुकसानीचा पंचनामा पशुसंवर्धन अधिकारी डॉ नितीन सोनवणे यांनी केला .