जळगावात २५७८ जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:20+5:302021-05-22T04:16:20+5:30

मोहीम तीव्र : सोशल डिस्टंसिंग, उल्लंघन करणारे रडारवर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून ...

Police action against 2578 people in Jalgaon | जळगावात २५७८ जणांवर पोलिसांची कारवाई

जळगावात २५७८ जणांवर पोलिसांची कारवाई

Next

मोहीम तीव्र : सोशल डिस्टंसिंग, उल्लंघन करणारे रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. सोमवार ते बुधवार अवघ्या तीन दिवसात विनाकारण फिरणे, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या २५७८ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क न वापरणाऱ्या २०३१ जणांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून ५ लाख २७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या ४५३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख २३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कलम १८८ अन्वये गुन्हे ९६ गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. १८ मे पर्यंत ९ हजार ५०१ रुग्ण कोरोना बाधित होते. दर दिवसाला ५०० च्यावर रुग्ण वाढत आहेत,तर मृतांची संख्यादेखील १० ते १५ च्या घरात आहे. यापार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत.

अशी आहे कारवाई

१) विना मास्क : २०३२

दंड : ५,२७,३००

२) सोशल डिस्टन्सिग : ४५३

दंड : १,२३,४००

३) कलम १८८ : ९६

दंड : ४८,०००

एकूण दंड : ६,९८,७००

कोट...

जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. जनतेने कोरोनाचे गांभीर्य ओळखून आता तरी सावधानता बाळगावी. पोलिसांची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. पुन्हा लाॅकडाऊनची वेळ येऊ न देणे जनतेच्याच हातात आहे. त्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन आरोग्य व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: Police action against 2578 people in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.