पोलीस व आरटीओने १२५ रिक्षा केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:52 PM2020-04-23T12:52:29+5:302020-04-23T12:52:56+5:30
जळगाव : लॉकडाऊन आदेश झुगारुन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या १२५ रिक्षावर बुधवारी शहर वाहतूक शाखा व आरटीओच्या वायु वेग पथकाने ...
जळगाव : लॉकडाऊन आदेश झुगारुन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या १२५ रिक्षावर बुधवारी शहर वाहतूक शाखा व आरटीओच्या वायु वेग पथकाने कारवाई केली. या सर्व रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन व संचारबंदी आदेश असल्याने प्रवाशी वाहतूक करण्यास रिक्षांना मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील बुधवारी शहरात काही चालक बिनधास्तपणे प्रवाशी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी वायु वेग पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक सचिंद्रकुमार राठोड, दीपक साळुंखे व पाडूरंग आव्हाड यांच्या पथकाने बुधवारी शहरात विविध चौकात १८ रिक्षा ताब्यात घेतल्या.
वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी १०७ रिक्षांवर कारवाई केली.
ज्या रिक्षा लॉकडाऊनचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा श्याम लोही व वाहतूक शाखेचे देविदास कुनगर यांनी दिला आहे.