पोलीस वर्धापनदिन अर्थात ‘विद्याथ्र्यानी हाताळले पोलिसांचे शस्त्र
By admin | Published: January 6, 2017 12:50 AM2017-01-06T00:50:24+5:302017-01-06T00:50:24+5:30
शस्त्र प्रदर्शन : एक हजार विद्याथ्र्यानी दिली प्रदर्शनाला भेट
जळगाव : रेझींग डे’ निमित्त गुरुवारी काव्यर}ावली चौकात शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. यात तब्बल एक हजार विद्याथ्र्यानी भेट देवून शस्त्रे स्वत: च्या हातात घेवून हाताळले. प्रत्येक शस्त्राबाबत कर्मचा:यांनी विद्याथ्र्याना माहिती दिली. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
गुरुवारी अखेरच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर होते. उपअधीक्षक एम.बी.पाटील (गृह), उपअधीक्षक सचिन सांगळे, राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले व वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
जयदुर्गा माध्यमिक विद्यालय मेहरुण, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, पुष्पलता गुळवे विद्यालय, ओरिऑन स्कूल, बी.यु.एन.रायसोनी विद्यालय, आर.आर.विद्यालय, या.दे.पाटील विद्यालय,बाहेती विद्यालय, सिध्दी विनायक विद्यालय व ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या विद्याथ्र्यानी प्रदर्शनाला भेट देवून शस्त्रांची माहिती जाणून घेतली. राखीव उपनिरीक्षक राजू पवार,भाऊसाहेब धादवड, वाहतूक शाखेचे सहायफ फौजदार सतीश सुकलाल, भरत पाटील, अशोक महाजन यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अॅण्ड कांताबाई मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.