चाळीसगावला दरोडा टाकण्याच्या तयारीतील संशयितांना पोलिसांची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 09:42 PM2018-02-16T21:42:32+5:302018-02-16T21:44:17+5:30
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने औरंगाबाद रस्त्यावरील एका ढाब्यावर थांबलेल्या दोन संशयितांवर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता शहर पोलिसांनी झडप घातली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६- दरोडा टाकण्याच्या उद्देशाने औरंगाबाद रस्त्यावरील एका ढाब्यावर थांबलेल्या दोन संशयितांवर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता शहर पोलिसांनी झडप घातली. अन्य चार दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
शहर पोलिसांना औरंगाबाद रस्त्यावर कन्नड घाटाच्या पायथ्याशी असणा-या ढाब्यावर काही दरोडेखोर असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक युवराज रबडे, गुन्हा शोध पथकाचे शशिकांत पाटील, पो.कॉ. बापू पाटील, राहुल पाटील, गोपाल भोई, संदीप पाटील यांचे पथक नियुक्त केले. या पथकाने संजय अजित राठोड (कंजर), वय २० रा. कुसेगाव ता. दौंड, जि. पुणे आणि अभिमन्यू दिनेश मन्नावद (वय २०), रा. चिखली ता. हवेली जि. पुणे या संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी राहुल नानावत राठोड, यतिम रमेश राठोड, अदित्य गोविंद शेखावत, अर्थवेद गणेश राठोड सर्व रा. पिंप्री चिंचवड जि. पुणे हे चारही संशयित विना क्रमाकांच्या मोटारसायकलवरुन पळून गेले. दोघांकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली व दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.