घरचे डबे घेऊन पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 04:46 PM2020-04-14T16:46:39+5:302020-04-14T16:48:30+5:30
कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
अमळनेर, जि.जळगाव : प्रत्येक मोठ्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या भोजनाची व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून केली जाते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भोजनातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये किंवा बाहेरील अन्न खाल्ल््याने पोलीस आजारी पडू नये म्हणून या लॉकडाऊन बंदोबस्तात जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. या दरम्यान नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरू नयेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणी प्रवेश करू नये म्हणून मागील २२ दिवसांपासून पोलीस रस्त्यावर खडा पहारा देत आहेत.
अमळनेर तालुक्यात सुमारे आठ पोलीस अधिकारी आणि ९० पोलीस कर्मचाऱ्यांसह एसआरपीचे ९०, आरसीपी १५, होमगार्ड १० बंदोबस्त कामी रस्त्यावर तैनात आहेत. मात्र, हा बंदोबस्त करताना पोलिसांना घराबाहेर पडताना पोटाची व्यवस्था करण्यासाठी डबा घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. लॉकडाऊन बंदोबस्तादरम्यान पोलीस प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली नाही. पोलिसांचे एकत्र जेवण तयार करणारा आचारी किंवा त्याचे सहकारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले तर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन बंदोबस्तात पोलीस प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाºयांच्या भोजनाची एकत्र व्यवस्था केली नाही.
त्यात लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत. परिणामी बाहेर जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्ताच्या कर्तव्यासाठी घराबाहेर पडताना जेवणाचा डबा घेऊन निघावे लागत आहे.
लॉकडाऊन दरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना नागरिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून जेवण आणून देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, भोजन घेताना आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.