स्वत:च्या संसारात विष कालविणा-या पित्याला पोलिसांनी घेतले ताब्यात, सोयगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:18 PM2017-11-23T13:18:51+5:302017-11-23T13:19:26+5:30
तिन्ही मुलांचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23 - शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने विषबाधा होऊन त्याच्या तीन मुलांचा जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर त्याच्या प}ीवर उपचार सुरु आहेत. स्वत:च्या संसारात विष कालवल्याची ही हृदयद्रावक घटना सोयगाव तालुक्यातील न्हावी तांडा येथे सोमवारी रात्री घडली. दरम्यान, पिठात विष कालवल्यानंतर फरार झालेल्या शेतक:यास बुधवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो काहीही बोलत नसल्याने व याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
राजू रतन राठोड हा शेतकरी न्हावी तांडा येथे आपली प}ी कावेरीबाई (32), मुलगी ज्योती (13), मोगली (9) व मुलगा राहुल (11) यांच्यासह राहतो. सोमवारी सायंकाळी राजूने प}ी शेतातून घरी येण्याच्या आधी घर गाठले. डब्यातील ज्वारीच्या पिठात पोलो नावाचे विषारी औषध कालवले. काही वेळानंतर त्याची प}ी घरी आली व तिने नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंबाने जेवण केले. जेवताना शेजारील दिनेश राठोडनेही येथेच जेवण केले. मात्र राजू नंतर जेवतो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. मध्यरात्री या पाचही जणांना उलटय़ा होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील राहुल व मोगली यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविले.
यातील ज्योती व मोगली यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बुधवारी दुपारी पावणेचार वाजता राहुल याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. कावेरीबाई व दिनेश मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार बुधवारी सोयगावजवळील धिंगापूर धरणाजवळ लपून बसलेल्या राजू राठोड यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. परंतु तो तोंड उघडण्यास तयार नाही. रात्री उशिरापयर्ंत पोलीस त्याची चौकशी करीत होते. त्याने पिठात विष का कालवले, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरापयर्ंत कुणीही फिर्याद दिली नसल्याने आम्ही अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.
घरच्या प्रमुखानेच स्वत:च्या संसारात विष कालवल्याने त्याला आपल्या तिन्ही पोटच्या गोळ्यांना गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरा या मुलांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर राजकीय मंडळींसह सोयगाव पोलिसांनी न्हावी तांडा येथे भेटी देऊन घटनेचा उलगडा करण्याचा प्रय} केला. घरातील ताणतणाव किंवा आर्थिक चणचणीतून राजूने कुटुंब संपविण्याचा प्रय} केला असावा, अशी चर्चा गावात सुरु आहे.