प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:55 PM2020-02-13T12:55:56+5:302020-02-13T12:56:08+5:30

जळगाव : पोलीस असल्याची बतावणी करुन मेहरुण चौपाटीवर प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाºया पवन रमेश काळे (२३, रा.तरसोद ता. जळगाव ) ...

 Police arrest two impersonators who blackmail lovers | प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक

प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक

Next

जळगाव : पोलीस असल्याची बतावणी करुन मेहरुण चौपाटीवर प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाºया पवन रमेश काळे (२३, रा.तरसोद ता. जळगाव) व रवींद्र भागवत चौधरी (२३, रा.भादली ता.जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मेहरुण तलावाच्या परिसरात फिरायला आलेल्या तरुण-तरुणी तसेच प्रेमीयुगुलांना मंगळवारी दुपारी काही तरुण पोलीस असल्याचे सांगून ब्लॅकमेक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली होती.
या तरुणांनी पोलिसांचा कमांडो गणवेश परिधान करुन कमरेला एका पिस्तुल लावलेला होता. त्याशिवाय पोलिसाचे लॉकेट व फायबरचा दांडा असल्याने ते पोलीस आहेत किंवा नाही याबाबत शंका होती, त्यामुळे शिरसाठ यांनी सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितेंद्र राजपुत, सचिन पाटील व मुकेश पाटील यांचे पथक तलावाकडे रवाना केले. हे पथक पोहचण्याच्या आधी सचिन चौधरी या कर्मचाºयाने रवींद्र भागवत चौधरी याला पकडून ठेवले होते. तितक्यात पोलिसांचे पथक तेथे धडकले.
चौधरी याला दुचाकी व बनावट पिस्तुलसह पकडण्यात आले. दुसरा साथीदार पवन काळे याला अजिंठा चौक परिसरात पकडण्यात आले.रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणांच्या खिशाची झडती घेतली
या तोतया पोलिसांनी प्रेमीयुगुलांना धाकात घेतल्यानंतर पुढे तलावाच्या काठी गौरव राजेंद्र पवार (रा.चंदु अण्णा नगर, जळगाव) हा त्याच्या मित्रांसह बसलेला असतांना ‘त्यांना तुम्ही इथे काय करता आहे. तुमची झडती घ्यायची आहे’ असे म्हणून खिसे चाचपडत होता.याचवेळी सचिन चौधरी या पोलिसाने तेथे येवून रवींद्र चौधरी याला पकडले.त्याच्याकडे पोलिसाचे ओळखपत्र मागितले असता तो गोंधळात पडला तर दुसरा साथीदार फरार झाला होता.

- पोलीस कर्मचारी सचिन चौधरी यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी आनंदसिंग पाटील यांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्या.अक्षी जैन यांनी दोघं संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title:  Police arrest two impersonators who blackmail lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.