कानळदा येथे पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:29 PM2017-10-09T23:29:14+5:302017-10-09T23:31:47+5:30
प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता.जळगाव येथे घडली.
Next
ठळक मुद्दे तरुणाच्या मृत्यूप्रकरणात न्यायासाठी काढला विनापरवानगी मोर्चावृध्द झोपले पोलीस वाहनासमोरगावातच अडविला मोर्चा
आ नलाईन लोकमतजळगाव दि, ९ : तालुक्यातील कानळदा येथील प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना अटक करावी या मागणीसाठी गावकºयांनी विना परवानगी मोर्चा काढला, त्याला प्रतिबंध करायला गेलेल्या पोलिसांवर गावकºयांनी हल्ला केल्याची घटना कानळदा, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, पोलिसांनीच मयत तरुणाचे आजोबा रामचंद्र देवचंद सपकाळे यांच्या डोक्यात काठी टाकली असा आरोपही गावकºयांनी केला आहे. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. प्रशांत सपकाळे या तरुणाचा मृतदेह २ आॅगस्ट रोजी पहाटे गावाबाहेर एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला होता. त्यामुळे प्रशांत याला कोणी तरी मारुन झाडावर लटकवून दिल्याचा आरोप त्याचे आजोबा रामचंद्र सपकाळे यांनी केला होता. या प्रकरणात तीन महिने उलटले तरी दोषींना अटक झाली नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गावातच अडविला मोर्चासकाळी दहा वाजता गावातील ५० महिला व पुरुष बॅनर घेऊन मुख्य चौकात जमले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी कुवारखेडा येथे जाणाºया पोलिसांना रस्त्यात गर्दी जमलेली दिसली. त्यांनी मोर्चेकरांना विरोध केला असता पोलीस व मोर्चेकरांमध्ये वाद झाला. परवानगी नसल्याने मोर्चा जागेवरच अडविण्यात आला. वृध्द झोपले पोलीस वाहनासमोरपोलीस व मोर्चेकºयात वाद होत असताना मयत प्रशांत याचे आजोबा रामचंद्र सपकाळे हे पोलीस वाहनासमोर झोपले. हवालदार राजेंद्र बोरसे यांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडाने स्वत:चे डोके फोडून घेतले. यात प्रचंड रक्तस्त्राव व्हायला लागल्याने सहायक निरीक्षक सचिन बागुल व उपनिरीक्षक बी.डी.पाटील यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही अंगावर जमाव धावून आला. त्यांच्याशी धक्काबुक्ती झाली. यावेळी सपकाळे यांनी रक्ताचे हात पोलिसांच्या कपड्यावर मारले.